फेमस

Bollywood update : ऑगस्ट महिन्यात एकामागे एक दणदणीत चित्रपट होणार रिलीज.

भुज द प्राईड ऑफ इंडिया' सिनेमा हॉटस्टारवर प्रदर्शित होईल

Bollywood update : ऑगस्ट महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेबसिरीज आणि सिनेमांचा पाऊस पडणार आहे.थिटएटरमध्ये सिनेमा कधी प्रदर्शित होणार, याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही . एकट्या अक्षयकुमारने ‘बेलबॉटम’ (belbottem ) सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याची घोषणा केलेली आहे.

ऑगस्ट महिना म्हणजे स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष. म्हणूनच ‘शेरशाह'(shersha) आणि ‘भुज’सारखे (bhuj) सिनेमा देशभक्तीचे रंग भरण्यास सज्ज झाले आहेत. ‘शेरशाह’ सिनेमा 12 ऑगस्ट रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर बघता येईल. यात सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत आहेत.शेरशाह चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मिडियाद्वारे शुभेच्छा देऊन कौतुक केले आहे.

13 ऑगस्ट रोजी ‘भुज द प्राईड ऑफ इंडिया’ सिनेमा हॉटस्टारवर प्रदर्शित होईल. यात अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, शरद केळकर यांच्या भूमिका आहेत.

हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धाच्या ( Hindustan -pakistan war )पार्श्वभूमीवरचा हा सिनेमा आहे. .ट्रेलरची सुरुवात 1971मधील गुजरातच्या भुजमधून होत असून भारतीय तिरंगा आकाशात फडकताना दिसणार आहे .

– ‘डायल 100’ येत्या 6 ऑगस्ट( 6 August) रोजी झी-5वर प्रदर्शित होणार असून यामध्ये अभिनेता मनोज वाजपेयी, नीना गुप्ता आणि साक्षी तन्वर यांच्या भूमिका सामिल आहेत.

याच महिन्यात झी-5वर आणखी एक महत्त्वाचा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ‘200- हल्ला हो’ सिनेमाचे नाव असून तो सत्य घटनेवर आधारित निर्माण केला आहे. 200 महिलांनी भर कोर्टात शिरून एका गुन्हेगाराला मारले होते , त्याची ही कथा आहे. यात अमोल पालेकर, रिंकू राजगुरू आणि वरुण सोबती यांच्या मुख भूमिका आहेत.

14 ऑगस्ट रोजी अमेझॉन प्राईमवर हॉलिवूड फिल्म ‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ बघता येईल. हा सिनेमा इंग्रजीव्यतिरिक्त हिंदी, तमीळ आणि तेलगूमध्ये देखील प्रदर्शित केला जाणार आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments