फेमस

Bollywood Update : सैफ आणि करीनाच्या दुसऱ्या मुलाच्या नावाचा खुलासा, घराचंही ठरलं नाव

पहिल्या बाळाचे नाव तैमूर अली खान असे आहे .

Bollywood Update : अभिनेता सैफ अली खान ( Saif Ali khan )आणि अभिनेत्री करीना कपूर ( kareena Kapoor) यांचा पहिल्या बाळाचे नाव तैमूर अली खान असे आहे .( Taimur Ali Khan)

तैमूरचे देशभरात खूप फान्स आहेत .प्रत्येक वेळी त्याच्या चेहऱ्यावर असणारे निरागस भाव आणि हास्य सर्वांचीच मनं जिंकून जातं… सातत्याने मीडियाच्या नजरेत असलेला तैमूर कोणा एका सेलिब्रिटीहून कमी नाही, असंच म्हणावं लागेल.

सैफ करिना दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहे. परंतु आता दुसऱ्या बाळाचे नाव काय असेल याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.गेल्या अनेक दिवसांपासून करिना दुसऱ्या बाळाचं नाव काय ठेवणार याबद्दल चर्चा सुरू होती. अखेर दुसऱ्या बाळाचं नाव समोर आलं आहे.( Second baby name )

सैफ-करिनाच्या दुसऱ्या बाळाचं नाव ‘ जेह ‘आहे. मात्र तैमूर अली खान याच्या छोट्या भावाच्या पूर्ण नावाची मोठी चर्चा सुरू आहे. करिना कपूरचं गर्भारपणातलं पुस्तक समोर आल्यानंतर ही चर्चा अधिक वाढली. बॉलिवूड हंगामाच्या एका रिपोर्टनुसार करिनाच्या नव्या पुस्तकात छोट्या बाळाच्या फोटोच्या खाली जहांगिर लिहिलं आहे. त्यामुळे करिना-सैफच्या दुसऱ्या बाळाचं संपूर्ण नाव ‘जहांगिर खान’ असल्याचं सांगितलं जात आहे.

ज्या प्रकारे तैमूर अली खानचा घराचं नाव टिमटिम ( timtim) आहे. त्या प्रकारे जहांगिरच्या घराचं नाव जेह असल्याचं सांगितलं जात आहे.( Jahangir)

माहितीनुसार मुगल बादशहा अकबर यांचा मुलगा नूर-उद-दीन मोहम्मद सलीम याचं नाव जहांगिर होतं. जहांगिर एक पारशी शब्द असून याचा अर्थ संपूर्ण जगाचा राजा असा होतो. हिंदुस्तानने यासंदर्भातील वृत्त देखील प्रसिद्ध केलं आहे.

;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments