आपलं शहर

CHITRA VAGH : अकोल्याच्या मुलीला राजस्थानमध्ये विकलं, पोलिसांचा भोंगळ कारभार… चित्रा वाघ यांची अनोखी मागणी

CHITRA VAGH : जून 2019 मध्ये अकोल्याच्या एका अल्पवयीन मुलीला राजस्थानमध्ये विकल्याची घटना घडली होती. ही घटना पूर्ण भारतभर वारंवार पहावयास मिळत होती.

CHITRA VAGH : कलम 363 अंतर्गत मुलींच्या अपहरणाच्या घटना देशात आता सतत पहावयास मिळत आहे. त्यांच्यावर आक्षेप घेणे सोडा त्याविषयी सहानुभूती देखील आता वाटेनाशी झाली आहे. अशीच एक घटना 2019मध्ये घडली होती. अकोलामधून एका मुलीचे अपहरण करून तिला राजस्थानमध्ये विकण्यात आले होते.

यानंतर त्या मुलीने स्वतःची कशीबशी सुटका करून पोलिसांकडे धाव घेतली होती. त्याच वेळी तिला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. परंतु ,तेथून सुटका झाल्यानंतर तिला कोणीही आधार देणारे किंवा मार्ग दाखवणारे नव्हते अशातच ती पुन्हा त्याच व्यवसायाकडे ओढली गेली.

काही दिवसांनंतर त्याठिकाणी पोलिसांची धाड पडल्यानंतर त्या मुलीने तिच्याकडचे आधार कार्ड पोलिसांना दाखवले. त्यात तिचा जन्म 2005 चा असल्याचे समजले म्हणजे तिचे 2019 मध्ये वय 14 वर्षे इतके होते. अल्पवयीन मुलीला त्यावेळी महिला बालकल्याण विभागात भरती करणे आवश्यक होते व ही जबाबदारी पोलिसांची व रुग्णालय प्रशासनाची होती.

पोलिसांनी तिला अल्पवयीन असल्याचे समजून त्या मुलीला तिच्या जीवावर व देवाच्या भरोश्यावर मोकळे सोडून दिले. पुन्हा त्या धंद्यात अडकल्यानंतर तिच्यावर पुन्हा आत्याचार झाले. याची जाणीव समाजाला झालीच नाही. तर धाड पडल्यानंतर सापडलेली ही 16 वर्षांची मुलगी त्यावेळी 8 आठवड्यांची गर्भवती होती.

महिला व बालकल्याण विभागाला कळवले असते तर एका अल्पवयीन मुलीचे भविष्य आज वेगळे असते. परंतु पोलिसांच्या आणि रुग्णालयाच्या बेजबाबदार वागणुकीमुळे आज एका अल्पवयीन मुलीचे भविष्य धूसर झाले आहे.

संबंधित पोलिसांना बालकल्याण विभागाने याविषयी प्रश्न विचारले असता संभाळून घ्या, आमच्याकडून चूक झाली असे उत्तर पोलिसांकडून मिळत आहेत. या घटनेत ज्या आरोपींनी तिची विक्री केली होती त्याचबरोबर ज्या पोलिसांनी आणि प्रशासनाने बेजबाबदारपणे त्या आरोपींवर कारवाई केली नव्हती त्या सर्वांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. या विषयी आपले मत मांडताना त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments