खूप काही

CMO Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मोठ्या घोषणा,पहा काय घेतले निर्णय

महाराष्ट्रात (Maharashtra) आलेल्या कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचा राज्यातील नागरिकांना मोठा फटका बसला आहे. ज्यामुळे राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते.

CMO Live :महाराष्ट्रात (Maharashtra) आलेल्या कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचा राज्यातील नागरिकांना मोठा फटका बसला आहे. ज्यामुळे राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. दरम्यान, कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली घट पाहता राज्यातील जवळपास 25 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले होते. मात्र, ज्या भागात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, त्या ठिकाणी कोरोनाचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांनी सुरुवातीला त्यांनी देशात नीरज चोप्रा याने ऑल्पिंकमध्ये सुवर्णपदक मिळवल्याने त्याचे अभिनंदन केले आहे. त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. तर गेल्या एका वर्षात वाटले होते की कोविड19 ची स्थिती कमी होईल. पण कोरोनाच्या लाटा एकापाठोपाठ येत आहेत. त्यामुळे नियमांबद्दल सविस्तर माहिती देणारच आहे असे उद्धव ठाकरे यांनी असे म्हटले.

Mumbai Local Restart | मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु, वाचा नियम आणि अटी

राज्याला गेल्या आणि यंदाच्या वर्षी सुद्धा महापुराचा फटका बसला. एकूणच राज्यातील पुराची स्थिती पाहता या काळात प्रशासनाने केलेल्या कामाचे उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले आहे. जवळजवळ साडेचार लाख नागरिकांना या परिस्थितीवेळी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई लोकल संदर्भात मोठी घोषणा केली आहे.लोकल सेवा १५ ऑगस्टपासून सुरु करण्यात येणार आहे परंतु
दोन डोस घेऊन १४ दिवस झालेल्यांना मुभा देण्यात येणार आहे,यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने पासची सुविधा करण्यात येणार आहे.

नैसर्गिक संकटाबाबत कायमस्वरुपी विचार करायचा आहे. मुख्यमंत्री घटनास्थळी गेल्यानंतर पॅकेजची घोषणा करतात. मी तसं केलं नाही. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही असं सांगितलं होतं. मी परतलो, मंत्रिमंडळाची बैठक झाली.

पालकमंत्री नागरिकांना मदत करत आहेत. तात्काळ आणि कायमस्वरुपी साडेअकरा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. वाटप सुरू झालं आहे. दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यात येणार आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments