आपलं शहर

corona unlock update : लहान मुलांना मॉलमध्ये नेताना सावधान, लागू शकतो दंड, किंवा…

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असल्याने आता राज्यात अनेक निर्बंध शिथिल केले जात आहेत.

corona unlock update : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असल्याने आता राज्यात अनेक निर्बंध शिथिल केले जात आहेत. त्याचबरोबर संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता काळजीपूर्वक पावलं उचलली जात आहेत. मुंबईत लोकल प्रवासासाठी दोन लस घेतलेल्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील मॉलसाठी नियमावली आखण्यात आली आहे. आता राज्यातील सर्व मॉल्सना सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र यासाठी सरकारने काही नियम घालून दिले आहेत.

शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्यांचं लसीकरण आवश्यक
कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन डोस घेणं आवश्यक
दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झाले पाहिजेत
लसीकरण प्रमाणपत्र, ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखवावं लागेल

राज्यातील सर्व शॉपींग मॉल्स रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.त्यामध्ये काम करणारे कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन्ही डोस पूर्ण केल्याचे आणि दुसरी मात्रा घेऊन 14 दिवस पूर्ण झाल्याचे लसीकरण प्रमाणपत्र मॉलच्या प्रवेशद्वारावर दाखविण्याबाबत याआधीच सूचना जारी करण्यात आल्या होत्या.

राज्यातील 18 वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा अथवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक करण्यात आले आहे. कोरोना निर्बंधासाठी असलेल्या ब्रेक द चेन अंतर्गत मार्गदर्शक सूचनांमध्ये आरोग्य विभागाने आज सुधारणा केली आहे.

राज्यात 18 वर्षाखालील मुला-मुलींचे लसीकरणास अद्याप सुरूवात न झाल्याने 18 वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेश देतांना वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा आणि महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक असणार आहे, असं नव्या मार्गदर्शक सूचनेमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, डेल्टा प्लस या नवीन आजाराचे रूग्ण देखील आढळून येत आहेत. शिवाय, कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे. दररोज राज्यात आढळणारी नवीन कोरोनाबाधितांची संख्यी ही कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या तुलनेत कधी जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. आज दिवसभरात राज्यात 5 हजार 811 रूग्ण कोरोनातून बरे झाले, तर 4 हजार 145 नवीन कोरोनाबाधित आढळून आले. याशिवाय राज्यात आज 100 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला.

हे ही वाचा  : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments