खूप काही

Corona update : कोरोनाचा तिसऱ्या लाटेची चाहूल, पहा बिग प्लॅन काय असेल?

Corona update : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेतून आपला देश अद्याप पुर्णपणे सावरला नाही. दुसऱ्या लाटेचं संकट संपत नाही,तज्ज्ञांच्या मते, ऑगस्ट महिन्यात सुरू झालेली कोरोना विषाणूची तिसरी लाट ऑक्टोबर महिन्यात अत्यंत भयंकर असू शकते. त्यामुळे यंदाही गणपती आणि दिवाळीमध्ये  कोरोना विषाणूच्या सावटाखाली आपल्याला साजरी करावी लागणार आहे. दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेची झालेली अवस्था पाहता, तिसरी लाटेनंही असचं थैमान घातलं तर देशापुढे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

हैदराबाद आणि कानपूरच्या आयआयटीमधील संशोधक मथुकुमल्ली विद्यासागर आणि मनींद्र अग्रवाल यांनी याबाबतचं संशोधन केलं आहे.गणितीय मॉडेलचा वापर करून देशात कोरोना स्थिती काय असेल, याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. कोरोनाचा सुपर म्यूटेंट व्हेरिअंट; ठरणार महाघातक, 3 पैकी एकाचा होईल मृत्यू रविवारी, भारतात 41,831 जण नव्यानं कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 541 जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, केंद्र सरकारनं केरळ, महाराष्ट्र आणि ईशान्य प्रदेशासह 10 राज्यांना इशारा दिला आहे.

वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारांनी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कडक पावलं उचलावीत, असं आवाहन केलं आहे. कोरोनाची तिसरी लाट अटळ पण, भारतातील तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती कोरोना विषाणू डेल्टा व्हेरिअंट कांजण्याप्रमाणे वेगात पसरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. ज्यांनी लसीकरण केलं आहे त्यांनाही या विषाणूची बाधा होऊ शकते. इंडियन सार्स-सीओव्ही -2 जीनोमिक कन्सोर्टियम (INSACOG) च्या आकडेवारीनुसार, मे, जून आणि जुलै महिन्यात आढळलेल्या प्रत्येक 10 कोरोना रुग्णांमध्ये 8 अत्यंत संसर्गजन्य असणारा डेल्टा व्हेरिअंट आढळला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments