Corona update : मुंबईसाठी नवी नियमावली जाहीर, व्यापाऱ्यांना मोठा दिलासा
अशावेळी आता मुंबई महापालिकेने पालिका हद्दीसाठी नवी नियमावली जारी केली आहे.

Corona update : कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने राज्य सरकारने निर्बंध काही प्रमाणत शिथिल केले आहेत कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेल्या 11 जिल्ह्यांत ब्रेक दि चैन अंतर्गत तिसऱ्या फेजचे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे, मात्र मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या 3 जिल्ह्यांत स्थानिक प्रशासनाकडून नवे नियम जाहीर केले जाणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली होती. अशावेळी आता मुंबई महापालिकेने पालिका हद्दीसाठी नवी नियमावली जारी केली आहे.
त्यात व्यापारी वर्गासह सर्व आस्थापनांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारपासून आठवड्याचे सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. औषधांची दुकाने 24 तास खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे, परंतू उपाहारगृहे मात्र दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. सरकारी आणि खाजगी कार्यालय देखील पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.
राज्य सरकारने निर्बंध शिथिल करताच आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी शहरासाठी नवे आदेश जारी केले आहेत. मुंबईचा गेल्या 2 आठवड्यातील संसर्ग दर पाहता पॉझिटिव्ह 1.76% तर ऑक्सिजन खाटांची आवश्यकता सरासरी 18.97 टक्के इतकी आहे, ही बाब लक्षात घेऊन निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. (All shops and establishment in Mumbai will Open till 10 pm)
मुंबईत कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता
1. सर्व दुकाने आणि आस्थापना आठवड्याचे सर्व दिवस रात्री 10
वाजेपर्यंत चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.
2. मेडिकल आणि केमिस्ट दुकाने आठवड्यातील सर्व दिवस 24 तास सुरु राहतील.
3.जलतरण तलाव आणि निकल संपर्क येऊ शकतो, असे क्रीडा प्रकार वगळून अन्य इनडोअर आणि आऊटडोअर खेळांना आठवड्याचे सर्व दिवस नियमित वेळेनुसार परवानगी असणार आहे.
4. सर्व रेस्टॉरंट, हॉटेल्स आठवड्याचे सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
5. मालिका व चित्रपटाचे चित्रीकरण नियमीत वेळेनुसार करण्यास परवानगी असणार आहे.
6. व्यायाम शाळा, योगा केंद्रे, ब्युटी पार्लर, सलून यामध्ये वातावरण अनुकूल यंत्रणा न वापरता सोमवार ते शुक्रवार रात्री 8 पर्यंत खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, तर शनिवारी दुपारी तीनपर्यंत रविवारी ते बंद राहणार आहे.