खूप काही

Uday samant : लवकरच महाविद्यालय सुरू होण्याची शक्यता ? उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती..

नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झालं की प्रत्यक्ष कॉलेज सुर करण्याचा विचार सुरु आहे, अशी माहिती माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

Uday samant : राज्यांत कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आला. परंतु आता दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झालं की प्रत्यक्ष कॉलेज सुर करण्याचा विचार सुरु आहे, अशी माहिती माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

यासंदर्भात कुलगुरु आणि जिल्ह्याधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जाणार आहे.प्रत्येक विभागात कुलगुरुंना जिल्हाधिकाऱ्यांकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यास सांगण्यात आलं आहे. त्यांच्याकडून अहवाल आल्नंतर कॉलेज सुरु करण्याचा विचार असल्याचं उदय सामंत यांनी सांगितले आहे.

वसतीगृह आणि कॉलेजची व्यवस्था पाहून येत्या 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान राज्यात पुन्हा कॉलेज सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.मात्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी कॉलेज सुरु होतील असं नाही त्याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. त्या भागातील कोरोनची स्थिती काय आहे यावर हा निर्णय घेतला जाईल. याबाबतचा अहवाल आमच्याकडे 15 दिवसांत येईल त्यानंतर यासंबंधीची माहिती दिली जाईल’ असं उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हंटलं आहे.

 

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments