Corona update :मुंबईकरांची चिंता वाढली, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरीएंटमुळे एकाचा मृत्यू…..
मुंबईत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटच्या पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे.

Corona update : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे कोरोना निर्बंधा मध्ये देखील शिथिलता देण्यात आली आहे. मुंबईत पण अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र अशा दिलायादायक परिस्थितीत आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटच्या पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. या मृत्यू मागचं आणखीन काय कारण आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला नियंमण देणाऱ्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने मुंबईकरांची चिंता वाढवली आहे. मुंबईत डेल्टा प्लस व्हेरिएंटनेमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. मृत महिला (वय 63) मुंबईच्या घाटकोपरमध्ये राहायला होती. डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे मृत्यू झालेली महाराष्ट्रातील ही दुसरी घटना आहे. याआधी रत्नागिरीतील एका 80 वर्षीय महिलेचा डेल्टा प्लसचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला होता. महाराष्ट्रात आलेली कोरोनाची दुसरी ओसरली असताना आता राज्यासमोर नवे संकट उभा राहिले आहे.राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंट धोका वाढू लागल्याने नागरिकांमध्ये चिंतानजक वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबईच्या पूर्व उपनगरात राहणाऱ्या 60 वर्षीय महिलेचा डेल्टा प्लसमुळे मृत्यू झाला आहे. या महिलेला कोरडा खोकला होता. त्याचबरोबर तिला अंगदुखीचाही त्रास होत होता. तिला चवही लागत नव्हती. तिची कोविड टेस्ट घेण्यात आली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्यावर अतिदक्षका विभागात (ICU) उपचार सुरू होते. ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आल्यानंतर रेमडेसिवीर आणि स्टेरॉइड्स त्यांना देण्यात येत होते. मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. मुंबईत बुधवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या सात रुग्णांपैकी ही महिला एक होती, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महत्वाचे म्हणजे, या महिलेने कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतले होते. मात्र, तरीही तिला प्लसचा संसर्ग झाल्याने जीव गमवावा लागला आहे. मुंबईत गुरुवारी डेल्टा प्लसचे 20 नवे रुग्ण आढळून आले होते. राज्यात डेल्टा प्लसच्या रुग्णांची एकूण संख्या आता 65
वर पोहोचली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
मुंबईत डेल्टा प्लस व्हेरियंटच्या पहिल्या बळीची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईत 11 डेल्टा प्लसचे रुग्ण होते, त्यापैकी एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, तर रायगड जिल्ह्यात नागोठणे येथे डेल्टाचा पहिला बळी गेला आहे.
याविषयी पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले, 55 वर्षीय महिला डेल्टा प्लस पॉझिटिव्ह रुग्ण फुफ्फुसाच्या गंभीर आजाराने कित्येक दिवसापासून अंथरुणाला खिळून होती. ती घरीच ऑक्सिजनवर होती. कोविड पॉझिटिव्ह झाल्यानंतर तिचा मृत्यू झाला. या महिलेची 21 जुलै रोजी चाचणी करण्यात आली होती. 25 जुलै रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, 27 जुलै रोजी तिचा मृत्यू झाला.
मात्र पालिकेकडे बुधवारी 11 ऑगस्ट रोजी ती महिला रुग्ण डेल्टा प्लस पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. तत्पूर्वी तिच्या मृत्यूची नोंद कोविड पॉझिटिव्ह अशीच करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्यांचा कोविड अहवाल जीनोम सिक्वेसिंगसाठी पाठवला होता. जीनोम सिक्वेसिंग अहवालातून त्या डेल्टा प्लस पॉझिटिव्ह 00.10 असल्याचे निदान करण्यात आले आहे
राज्यात कोणत्या जिल्हात किती डेल्टा प्लसचे रुग्ण?
जळगाव – 13 रुग्ण,रत्नागिरी – 12 रुग्ण
मुंबई – 11 रुग्ण,पुणे, ठाणे – प्रत्येकी 6 रुग्ण
पालघर – 3 रुग्ण,गोंदिया, नांदेड, रायगड – 2 रुग्ण
चंद्रपूर, अकोला, सिंधुदुर्ग, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद, कोल्हापूर आणि बीड – प्रत्येकी 1 रुग्ण
हे ही वाचा :