Mumbai Updates :कोरोनामधील अतिशय आनंदाची बातमी मुंबईमध्ये एकही कंटेन्मेंट झोन नाही….
ज्यानंतर कोरोनाची परिस्थिती पाहून दुकाने, मॉल आणि उपहारगृहांना रात्री दहा वाजपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे

Mumbai Updates :महाराष्ट्रात आलेल्या आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर ( second wayv) राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन घोषीत करण्यात आले. ज्यामुळे राज्यातील दुकाने, मॉल आणि उपहारगृह निर्बंधाखाली सुरु होते. परंतु, गेल्या दीड वर्षांपासून आर्थिक नुकसानीला सामोरे जावा लागत असून दुकाने, मॉल आणि उपहारगृहांच्या वेळेत वाढ करावी, अशा मागणींनी जोर धरला होता.
ज्यानंतर कोरोनाची परिस्थिती पाहून दुकाने, मॉल ( shopes ,mall) आणि उपहारगृहांना रात्री दहा वाजपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ज्याठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, अशा ठिकाणी निर्बंध काय असतील.
महत्वाचे म्हणजे, दुकाने, उपाहारगृहे, मॉलमधील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण होऊन 14 दिवस पूर्ण होणे बंधनकारक असेल. उपाहारगृहे आणि बार आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. पार्सलसेवा 24 तास सुरू राहील. दरम्यान, मास्क लावणे बंधनकारक राहील. मॉलमध्ये प्रवेश करताना ग्राहकांना लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
काही महिन्यांपूर्वी राज्यातील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट ( mane hospot) असलेल्या मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव आता पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट जवळपास ओसरल्यामुळे मुंबईसह राज्यभरात रविवारपासून निर्बंध शिथील होतील. राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे ( ADITYA THACKRYE) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आजघडीला एकही कंटेन्मेंट झोन उरलेला नाही.
तसेच शनिवारी दिवसभरात महाराष्ट्रात पुन्हा एकदा विक्रमी लसीकरण झाले. कालच्या एका दिवसात रात्री 9 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 9.52 लाख आणि मुंबईत 1.51 लाख जणांचे लसीकरण झाल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन दिली.
दोन आनंदाच्या बातम्या:
१. आज रात्री ९ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ९.५२ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. तर, १.५१ लाख मुंबईकरांचे लसीकरण झाले.
२. आजघडीला मुंबईत एकही कंटेनमेंट झोन नाही.
पण तरीही, मास्क वापरा, लस घ्या, सुरक्षित रहा!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 14, 2021