Gajanan Kale : गजानन काळेंचे आहेत अनैतिक संबंध, मनसेचा हिरो झाला पत्नीमुळे झिरो..
मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gajanan Kale :मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळे यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.पती गजानन काळे यांच्याकडून मारहाण तसेच जातीवाचक शिवीगाळ होत असल्याचे त्यांच्या पत्नीने तक्रारीत म्हंटले आहे. यावरून मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु होते. अखेर बुधवारी रात्री काळे यांच्या पत्नीने नेरुळ पोलीस ठाण्यात पती गजानन काळे यांच्या विरोधात तक्रार केली. त्यानुसार अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Gajanan Kale has an immoral relationship, MNS hero became Zero because of his wife.)
तर ‘2008 मध्ये आमचं लग्न झालं. लग्नानंतर 15 दिवसांनी गजानन माझासोबत किरकोळ घरगुती कारणावरून भांडण करून माझा सावळा रंग व माझी जात या कारणावरून मला टोमणे मारू लागला. जातीवाचक शिवीगाळ करू लागला. तो मला बोलला की, तू सावळी आहेस, तुझी जात वेगळी आहे तरी देखील मी तुझ्याशी लग्न केले आहे. माझी चूक झाली. तुझ्या वडिलांची पोस्ट बघून मी तुझ्याशी लग्न केले परंतु त्याचा मला काही एक फायदा झाला नाही असे बोलला. तेव्हा आमच्या दोघांमध्ये भांडण झाले होते, त्यावेळी गजानन याने मला मारहाण केली होती’ असंही त्यांच्या पत्नीने पोलिसांना एफआयआरमध्ये सांगितलं आहे.
View this post on Instagram
तसेच “त्याने अनेक महिलांशी त्याचे अनैतिक संबंध सुरु होते. 2018 मध्ये एका महिला टीव्ही पत्रकारासोबत त्याचं अनैतिक संबंध सुरु होतं. मी गजाननच्या मोबाईलमध्ये दोघांचे मेसेज पाहिले होते. त्यांना दोघांना एकत्र फिरताना देखील मी पाहिले होते तसेच हॉटेलमध्ये जेवताना पाहिलं. त्यानंतर पुन्हा 2021 मध्ये एका महिला पत्रकारासोबत त्याचे अनैतिक संबंध सुरु झाले. याबद्दल मी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला मात्र, मी राजकारणी आहे, मला कुणी काही करु शकत नाही.. मला तू आणि मुलगा यांच्यापासून स्पेस हवी आहे…. तुझी आणि मुलाची मी यापुढे जबाबदारी घेणार नाही, असं म्हणत सातत्याने त्याने मला त्रास दिलाय”, असंही पोलिस तक्रारीत म्हटलं आहे.
नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर पत्नीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरूळ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानसिक आणि शारीरिक छळवणूक करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी कलमांखाली नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे नवी मुंबईत आणि मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा :