समाजकारण

Ganesh Chaturthi Rules : गणेशउत्सवला यंदाही कोरोनाच सावट, सरकारने जारी केली नियमावली…

बैठकीतील निर्णयानुसार सार्वजनिक मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.तसेच चौपाट्यांवर गणेश मूर्तीचं विसर्जन करता येणार आहे.

Ganesh Chaturthi Rules : मुंबईतील गणेश विसर्जनासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबई महापालिका आणि गणेश मंडळांची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीतील निर्णयानुसार सार्वजनिक मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.तसेच चौपाट्यांवर गणेश मूर्तीचं विसर्जन करता येणार आहे.Ganesh Utsav is still in its infancy, the rules issued by the government …

दुसऱ्या लाटेतून आपण डॉक्टरांच्या मेहनतीमुळे बाहेर पडलो आहोत. आता जी विंडो आपल्याला मिळाली आहे. तिचा वापर आपण थोडं अर्थचक्र सावरण्यासाठी करूया. पुन्हा ती काळरात्र नको; जनतेचे प्राण वाचवण्यासाठी आपण आपली संस्कृती परंपरा देखील काहीवेळ बाजूला ठेवून समजूतीने गर्दी टाळण्यासाठी आपल्याला सुरक्षेचं पाऊल उचलावं लागेल.”

2020 मध्ये कोरोनामुळे गणेशोत्व सरकारी नियम आणि बंधनांमध्येच साजरा करावा लागला होता. आगामी गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका आणि गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत गतवर्षीची नियमावली यंदाही कायम राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. गणेशोत्सवासाठी भाविकांना दर्शनाची परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय पोलिसांसोबत चर्चा करुन वरिष्ठ पातळीवर घेण्यात येणार आहे.

* असे असतील विसर्जनाबाबतचे नियम

1) सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तीच्या उंचीची मर्यादा 4 फूट.

2) घरगुती गणेशमूर्ती 2 फूट उंचीची असावी

3) गर्दी होणार नाही याची काळजी गणेशमंडळानी घ्यावी.

3) 84 नैसर्गिक गणेश विसर्जन ठिकाण.

4) विसर्जन ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे मूर्ती द्यावी लागेल.

5) नंतर महापालिकेमार्फत गणेश विसर्जन होणार.

6) सार्वजनिक मूर्ती विसर्जनासाठी केवळ 10 कार्यकर्त्यांना परवानगी मिळणार.

7) लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जनाला जाऊ नये.

8) मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी ऑनलाईन दर्शनाची सोय करावी.

 

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments