Mumbai News : आनंदाची बातमी; ‘लालबागचा राजा’ मंडळाने घेतला मोठा निर्णय
लालबागच्या गणेशोत्सवाची तयारी सुरू केली आहे.

Mumbai News :राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार लालबागचा गणेशोत्सव (lalbag ganeshutsav) साजरा केला जाणार असून राज्य सरकारकडून नियमावलीमध्ये शिथिलता आणण्याची मागणी केली जात होती. मात्र, अद्याप मागणी पूर्ण झाली नाही. एक महिन्यांवर आलेल्या लालबागच्या गणेशोत्सवाचे तयारी सुरू केली आहे. तर, रक्तदान शिबिर व अन्य सामायिक उपक्रम राबविण्याचे अद्याप कोणतेही नियोजन झालेले नाही.”
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राज्य आणि केंद्र सरकारने कोरोनाच्या नियमावल, (restrictions, safety) अटी ,सूचनांचे पालन करून यंदाचा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. कोरोना महामारीच्या तिसर्या लाटेचा धोका व्यक्त केला जात असताना, लालबागच्या राजाचा दरबार भरणार आहे. यावेळी सरकारने जाहिर केलेल्या नियमांचे पालन करून यंदाची लालबागची मूर्ती ही 4 फुटांपेक्षा उंच नसेल, असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
कोरोना महामारीमुळे ( Corona lockdown)मागच्या वर्षी लालबागमध्ये गणेशउत्सव साजरा केला नाही. तसेच मागील वर्षी येथे गणेश उत्सवाऐवजी रक्तदान आणि प्लाझ्मा डोनेट कॅम्प लावण्यात आले होते. परंतु यावर्षी लालबाग गणेशोत्वसाचे आयोजन होणार आहे. लालबागच्या (hight) मूर्तीची उंची 4फूट असेल आणि लोक घरात गणपतीची मूर्ती स्थापन करतील ती 2 फुटापेक्षा जास्त उंचीची नसावी . याशिवाय आयोजनाच्या दरम्यान कोरोना नियमांचे विशेष लक्ष ठेवून सरकारने सांगितल्याप्रमाणे, कोरोना संकट लक्षात घेता गणेशोत्सव एकदम साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली.