फेमस

Google : Google घेऊन येतोय 6GB RAM चा धमाकेदार समार्टफोन.

Google : Google कडून नव्या फोनची घोषणा करण्यात आली आहे.

Google : गुगलकडून नव्या फोनची घोषणा करण्यात आली आहे. Pixel 5A ला घेऊन मार्केटमध्ये खूप साऱ्या बातम्या पसरत आहेत. आधी बोलले जात होते की, हा फोन बनणारच नाही, मात्र आता हा फोन लवकरच बाजारात येणार असल्याच्या चर्चा होत आहेत. ऑगस्टच्या 26 तारखेला हा फोन लाँच होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.

मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे अनेक कंपन्यांना या क्षेत्रामध्ये आपला व्यवसाय वाढवण्याची संधी मिळाली आहे. आज बजारात अनेक वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल्स उपलब्ध आहेत. गूगलची पिक्सल सिरीज देखील लोकांच्या आवडीची ठरत आहे. काही वेळापूर्वी अशी बातमी समोर आली होती की, गुगल चिप शॉर्टेजमुळे
Google pixel 5A बनवत नाही, परंतु गुगलने हे विधान फेटाळून लावलं आहे. ते मोबाईल बनवण्याच्या तयारीत आहेत हे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

फ्रंट पेज टेकच्या एका रिपोर्ट अनुसार Google pixel 5a हा स्मार्टफोन 26 ऑगस्ट रोजी लाँच होणार आहे. तसेच हा फोन ऑनलाईन किंवा गुगल स्टोअरवरून देखील खरेदी केला जाऊ शकतो. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की या फोनची किंमत 450 यूएसडी (33,394 रुपये)  एवढी असू शकते.

रिलीज डेटवर जरी गुगलने कोणती माहिती दिली नसली, तरी हा फोन अमेरिका आणि जपान या दोन देशांमध्ये लाँच होणार असल्याचे गुगलचे सांगीतले आहे. त्यामुळे हा फोन भारतात लाँच होणार नाही. परंतु तो पुढील काही काळात भारतामध्ये लाँच होईल अशी आशा वर्तवली जात आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments