खूप काही

Government Bank : सरकारी बँकांच्या विक्रीची प्रक्रिया मंदावली ;पहा कारण

सरकारला ही प्रक्रिया सुरु करण्यासाठी सध्याच्या कायद्यांमध्ये बदल करावा

Government Bank : दोन सरकारी बँकांच्या (govt banks) विक्रीची योजना केंद्र सरकारनं एका वर्षासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पण सरकारला ही प्रक्रिया सुरु करण्यासाठी सध्याच्या कायद्यांमध्ये बदल करावा लागेल. यासाठी संसदेची मंजुरीही (parliament sanction) आवश्यक असेल, अशी माहिती या संबंधीत विषयतज्ज्ञांनी दिली आहे. मनी कन्ट्रोलनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

नाव न सांगण्याच्या अटीवर मनी कन्ट्रोलला सुत्रांनी सांगितलं की, “या बँकांच्या विक्रीबाबत संसदेची मंजुरी घेण्याची पद्धतही अद्याप निश्चित केलेली नाही. तसेच या आर्थिक वर्षात आता इतका वेळ शिल्लक नाही की या वेळेत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल.”

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (nirmala sitaraman ) यांनी फेब्रुवारी महिन्यात म्हटलं होतं की, “सरकार दोन सरकारी बँकांच्या विक्रीसाठी मार्च 2022 पर्यंत खरेदीदाराचा तपास लावेल.

मात्र, या बातमीवर अर्थ मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

जुलै महिन्यात आलेल्या ब्लुमबर्गच्या एका अहवालात म्हटलंय की, “बँकांच्या विक्रीची ही प्रक्रिया मंदावली आहे. तसेच सन 2021 सोडून 2022 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. पण सरकार एलआयसीच्या IPO सहित आपल्या दुसऱ्या संपत्ती विक्री योजनेबरोबर पुढे जाऊ शकते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments