Hardik Pandya: मैदानाच्या बाहेरही पांड्याची कर्तबगारी, फॅशनमध्ये ठरला टॉप
खेळाडू हे फॅशन आणि जाहिरातींमधील विश्वात ही तितकेच आघाडीवर आहेत.

Hardik Pandya : क्रिकेटच मैदान गाजवण्यासोबतच सध्याचे युवा खेळाडू हे फॅशन आणि जाहिरातींमधील विश्वात ही तितकेच आघाडीवर आहेत.
भारतीय क्रिकेटपटू ( Indian cricketer )सध्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत (international sport ) सहभागी नाहीत. अशा मोकळ्या वेळेचा फायदा घेण्याचा ते प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.
क्रिकेट विश्वातील भारतीय खेळाडू हार्दिक पांड्याचे(Hardik Pandya) फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पहायला मिळत आहेत. हार्दिकचा प्रत्येक लूक जितका खास असतो, तितकाच तो लक्षवेधीत करणारा देखील आहे.
हार्दिक पंड्याने गुरुवारी त्याच्या चाहत्यांना नवीन डॅशिंग हेअरस्टाईल(hairstyle) लूकने आश्चर्यचकित केले . त्याने आपले काही छायाचित्रे इन्स्टाग्रामवर शेअर केली.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी भारताचे माजी कर्णधार एमएस धोनीने ‘मोहॉक’ (MS Dhoni)लूक केला होता. तर आता दुसरीकडे हार्दिकची नवीन हेअरस्टाईलची रचना केशरचनाकार ‘अलीम हकीमने ‘ ( aalim Hakim) केली आहे, तो हार्दीकच्या नवीन निर्मितीमागील बार्बर आहे.
, जिथं त्यानं ‘बाल्ड लूक’ला पसंती दिल्याचं कळत आहे. या लूकमध्येही तो जितक्या सहजतेनं वावरत आहे, ते पाहता चाहत्यांनी पुन्हा एकदा त्याच कौतुक केलं आहे.
गेल्या महिन्यात, आलिमने सोशल मीडियावर धोनीचे फोटो शेअर केले होते.
धोनी आणि हार्दिक दोघेही आता आयपीएलमध्ये खेळी करताना दिसतील, जे यूएईमध्ये (UAE) पुन्हा सुरू होणार आहे.
हार्दिक पांड्याच्या या आगळ्यावेगळ्या लूकला चार तासांत 1 दशलक्षाहून (100000)अधिक लाइक्स मिळाले आहेत. हार्दिकच्या नवीन हेअरस्टाईलचे कौतुक करण्यासाठी अनेक चाहत्यांनी कमेंट सेक्शनचा आधार घेतला. टिप्पणी करणाऱ्यांमध्ये हार्दिकची पत्नी नतासा स्टॅन्कोविक(natasa stankovic) होती, ज्याने दोन फायर आणि हार्ट-आय इमोटिकॉन्स पोस्ट केले. एका वापरकर्त्याने विनोदाने हार्दिकला विचारले की तो त्याचा फॉर्म कधी परत मिळवणार आहे, तर दुसऱ्याने त्याला “देखणा” म्हटले.
;
#MSD #MSDhoni #cricket #SureshRaina #hardikpandya #memes @msdhoni @ImRaina @hardikpandya7
Koi bataega ki saare cricketers same hairstyle kyu rakh rahe hai pic.twitter.com/FeuqtKQwv3
— Memer Bean (@memer_bean) August 12, 2021