क्राईम

Help Mumbai Police : पोटच्या गोळ्याने घराबाहेर काढलं, मुंबईच्या खाकी वर्दीने सांभाळलं…

आजकाल आईवडिलांना घराबाहेर काढताना कुठल्याही मुलामुलींना भिती वाटत नाही. आयुष्यभर ज्या आईवडिलांनी हाताच्या खोडासारखं सांभाळलं

Help Mumbai Police आजकाल आईवडिलांना घराबाहेर काढताना कुठल्याही मुलामुलींना भिती वाटत नाही. आयुष्यभर ज्या आईवडिलांनी हाताच्या खोडासारखं सांभाळलं, आज त्याच आईवडिलांना घरातून बाहेर काढताना मुलांना काहीच वाटत नाही. अशीच एक घटना घडली आहे मुंबईच्या विलेपार्ले परिसरात. (Mumbai Police took care of the boy after he kicked his mother out of the house)

एकुलता एक मुलाने आपल्या आईला घराबाहेर काढल्याची घटना समोर आली आहे. इथून पुढचं आयुष्य कसं आणि कुठं काढायचं असा प्रश्न डोळ्यासमोर असताना बेघर आजींच्या मदतीसाठी खाकी वर्दी धावून आली आहे.

पतीच्या निधनानंतर 15 वर्ष अनेक घरांमध्ये धुनीभांडी करून एका महिलेने आपल्या मुलाचा सांभाळ केला. मात्र आपल्या आईचे ऋण फेडण्याच्या जागी केलेले सर्व उपकार विसरून त्याच मुलाने आजीला घराबाहेर काढलं.

बेघर आजीने ज्यांच्या घरामध्ये 15 वर्षांपासून धुनीभाडीचं काम केलं, त्यांच्याकडे मदतीची मागणी केली मात्र त्यांनीही मदत करण्यास साफ नकार दिला. त्यानंतर कोरोनामुळे अनेक वृद्धाश्रमांनीही ठेवून घेण्यास नकार दिला. अखेर त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. वृद्धश्रमांनी नकार एक वर्षभर या आजीचा संभाळ विलेपार्ले
पोलिसांनी केला.

अखेर एक वर्षानंतर आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांनी मावळ तालुक्यातील वृद्ध आश्रममध्ये कायम स्वरूपी एक जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments