आपलं शहर

Mumbai Local | मुंबई लोकलसाठी पास कसा मिळवाल, वाचा सोप्पी पद्धत

मुंबई लोकल कधी सुरु होणार अशी विचारणा अनेकजण नेहमी करत होते, अखेर त्या सगळ्या प्रश्नांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.

Mumbai Local | मुंबई लोकल कधी सुरु होणार अशी विचारणा अनेकजण नेहमी करत होते, अखेर त्या सगळ्या प्रश्नांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. मुंबई लोकल मुंबईकरांना लवकर सुरु होणार मात्र त्यासाठी काही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत, त्या सर्व अटी आणि नेमका मुंबई लोकलसाठी पास कसा काढता येणार आहे, हे आपण जाणून घेणार आहोत…

गेल्या काही दिवसांपासून मुंबई लोकल सुरु करण्याची मागणी सामान्य नागरिकांपासून विरोधी पक्षनेते करत होते; मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: या सगळ्यांसदर्भात उत्तर दिलं आहे. येत्या 15 ऑगस्टपासून मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु केली जाणार असल्याचं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या facebook live मधून मांडलं आहे. (Mumbai Local for all, read the terms and conditions)

सामान्य नागरिकांचं अर्थचक्र सुरु राहण्यासाठी आणि तळहातावर पोट असणाऱ्यांसाठी ही सेवा सुरु करत आहोत, असं सांगायला विसरले नाहीत. मुंबईतील अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंधांच्या मदतीने सर्वसामान्य मुंबईकरांना लोकलचा प्रवास सुरु करण्याची मान्यता देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी live च्या माध्यमातून म्हटलं आहे.

ज्या नागरिकांनी कोरोनाच्या कोणत्याही लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत आणि लस घेऊन 14 दिवस पूर्ण झाले आहेत, फक्त अशा नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करता येणार असल्याची पहिली अट मुख्यमंत्र्यांनी सांगितली आहे.

जे नागरिक स्मार्टफोन वापरतात, ते प्रवाशी मोबाईल एपच्या माध्यमातून रेल्वेच्या पाससाठी लागणारा बारकोड डाऊनलोड करू शकणार आहेत. मात्र ज्यां नागरिकांकडे स्मार्टफोन नाही, अशा प्रवाशांनी मुंबई पालिकेच्या प्रभागीय कार्यालयात भेट द्यायची आहे, तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घ्यायचे आहेत. ही दुसरी अट लोकल प्रवासासाठी ठेवण्यात आली आहे.

लोकल प्रवासासाठी मिळणारा पासवर क्यूआर कोडची सिस्टीम असणार आहे. जेणेकरून रेल्वे प्रशासनाला म्हणजेच तिकीट चेकर्संना त्याची सत्यता पडताळण्यासाठी सोप्प होणार आहे. हा नियम मुख्यमत्र्यांनी नागरिकांसमोर ठेवला आहे. या सगळ्यात मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना एक आवाहनही केलं आहे. कुणीही अवैधरित्या किंवा बेकायदेशीररित्या पासेस प्राप्त करून घेऊ नयेत. लोकल प्रवासाच्या निमित्ताने कोरोना लसींचे दोन डोसेस घ्यावेत आणि प्रवास करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments