राजकारण

Police updated : महाराष्ट्रात पोलीसांच्या बदल्याचे सत्र चालू, आता ही मोठमोठया अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या…

प्रक्रियेनुसार कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना नव्या ठिकाणी यांची नियुक्ती देण्यात आली आहे.

Police updated :राज्याच्या पोलीस दलात मोठ मोठे फेरबदल करण्यात आले आहेत . भारतीय पोलीस सेवेतील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.याआधी जुलै 2021 मध्ये राज्यातील 14 ISA अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. प्रशासकीय कामाचा भाग म्हणून नियमित बदल्यांच्या प्रक्रियेला राज्य सरकारने निश्चितच कालमर्यादा दिली आहे. त्यामुळे या कालावधीत वेगवेगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांना वेग आल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रक्रियेनुसार कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना नव्या ठिकाणी यांची नियुक्ती देण्यात आली आहे.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे:

1. जी एम बोडके सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कल्याण यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, अकोला महानगरपालिका या पदावर करण्यात आली.

2. एस जी देशमुख, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे यांचे नियुक्ती अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, मुंबई या पदावर करण्यात आली.

3. एम देवेंद्र सिंह यांची नियुक्ती संचालक, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे या पदावर बदली करण्यात आली आहे.

4. राहुल कर्डिले, यांची सह महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर करण्यात आली आहे.

5. जी एस पापळकर यांची नियुक्ती जिल्हाधिकारी, हिंगोली या पदावर करण्यात आली.

6. रुचेश जयवंशी जिल्हाधिकारी, हिंगोली यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला या पदावर करण्यात आली आहे.

7. एन आर गटणे, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, पालघर यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड या पदावर करण्यात आली.

8. दीपेंद्रसिंह कुशवाह, आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नवी मुंबई यांची नियुक्ती सहसचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.

9. संजय दैने, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, मालेगाव महानगरपालिका येथे करण्यात आली आहे.

10. अनिल पाटील, व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांची नियुक्ती सचिव, प्रदेश नियंत्रण प्राधिकरण, मुंबई या पदावर झाली आहे.

11. मलीकनेर, सहमुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई यांची नियुक्ती आहे त्याच पदी ठेवली आहे.

12. सुरेश जाधव यांची नियुक्ती आयुक्त, कामगार महाराष्ट्र राज्य, मुंबई या जागी करण्यात आली.

13. प्रताप जाधव, उपायुक्त, पुणे महसूल विभाग, पुणे यांची नियुक्ती उप महासंचालक, यशदा, पुणे या पदी करण्यात आली आहे,तसेच

14. कुमार खैरे यांची नियुक्ती सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळ या पदावर करण्यात आली.

राज्याच्या पोलीस दलात हे मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. भारतीय पोलीस सेवेतील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या ही करण्यात आल्या आहेत.

यात अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या पदांसह पोलीस उपमहानिरीक्षक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या पदांवर बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच बदली किंवा पदोन्नती असं या बदल्याचं स्वरुप आहे. अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या पदांसाठी 14 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस उपमहानिरीक्षक पदांसाठी 16 आणि विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या पदांवर 7 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments