खूप काही

Independence day : अभिमानाची गोष्ट, महाराष्ट्रातील 67 पोलिसांचा सन्मान, पाहा संपूर्ण यादी

केंद्रीय राखीव पोलीस दलातील दिवंगत हवालदार सुनील काळे (सोलापूर) यांना मरणोत्तर 'राष्ट्रपती शौर्यपदक' जाहीर झाले तर उर्वरित 67 अधिकारी व अंमलदार हे महाराष्ट्र पोलीस दलातील आहेत.

Independence day : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वदिनी केंद्रीय गृह मंत्रालयाच्यावतीने त्याची घोषणा करण्यात आली. केंद्रीय राखीव पोलीस दलातील दिवंगत हवालदार सुनील काळे (सोलापूर) यांना मरणोत्तर ‘राष्ट्रपती शौर्यपदक’ जाहीर झाले तर उर्वरित 67 अधिकारी व अंमलदार हे महाराष्ट्र पोलीस दलातील आहेत. त्यात गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त डुंबरे, नाशिक ग्रामीणचे उपनिरीक्षक अशोक अहिरे व यवतमाळचे उपनिरीक्षक विनोदकुमार तिवारी यांना उत्कृष्ट सेवेबद्दल ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे.

पोलीस दलात शौर्यपूर्ण, उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण सेवा बजावणाऱ्या महाराष्ट्रातील 68 पोलीस अधिकारी – अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. त्यात राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त आशुतोष डुंबरे, मुंबईतील उपायुक्त मंजुनाथ शिंगे, सहायक आयुक्त वासंती रासम, निरीक्षक चिमाजी आढाव आदींचा समावेश आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 67 पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यात तीन पोलिसांना उल्लेखनीय सेवा, 25 पोलिसांना उल्लेखनीय सेवा तर 39 पोलिसांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी पदक जाहीर करण्यात आले आहे.

शौर्य पदकांमध्ये गडचिरोली, मुंबई, ठाणे ग्रामीण, गोंदिया, नागपूर, अमरावती आणि औरंगाबादच्या पोलिसांचा समावेश आहे. त्यात गडचिरोलीचे पोलीस हवालदार लिंगनाथ नानया पोरतेट, अरविंदकुमार पुरणशहा मडावी, रोहिदास शिळुजी निकुरे, पोलीस नाईक मोरेश्वर पत्रू वेलादी, सडवली शंकर आसम, बिच्चू पोच्या सिडाम, शामसाय ताराचंद कोडापे, प्रविण प्रकाशराव कुळसाम, आशिष देवीलाल चव्हाण, पोलीस शिपाई पंकज सिताराम हलामी, आदित्य रविंद्र मडावी, रामभाऊ मनुजी हिंचामी, मोगलशहा जीवन मंडावी, ज्ञानेश्वर देवराम गावडे आणि शिवा पुडलिंक गोरले, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देवराम पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन सुरेश काटकर, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन धनाजी कोळेकर (औरंगाबाद शहर), पोलीस अधीक्षक हरि बालाजी (अमरावती ग्रामीण), पोलीस उपअधीक्षक नवनाथ ठकाजी ढवळे (ठाणे ग्रामीण), पोलीस उपायुक्त मंजुनाथ हुचप्पा सिंगे (मुंबई), सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार परमानंद तिवारी (नागपूर शहर) यांचा समावेश आहे.

पोलीस दलातील उल्लेखनीय सेवेबाबत राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त आशुतोष डुंबरे, नाशिक ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक अशोक उत्तम अहिरे, महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोदकुमार लालताप्रसाद तिवारी यांचा समावेश आहे.

गुणवत्तापूर्वक सेवेसाठी 39 पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. त्यात समादेशक मधफकर किसनराव सातपुते (औरगाबाद, रारापोबल), अतिरिक्त पोलीस आयुक्त शेखर गुलाबराव कुर्हाडे (मोटार परिवहन विभाग-मुंबई), सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेंद्र मधुकर देशमुख (पुणे), ज्योत्स्ना विलास रासम (मुंबई), पोलीस निरीक्षक मधुकर गणपत सावंत (मुंबई-राज्य गुप्तवार्ता विभाग), सहाय्यक समादेशक ललित रामकृपाल मिश्रा (नागपूर-राज्य राखीव पोलीस बल), पोलीस निरीक्षक राजेंद्र अंबादासजी राऊत (अमरावती-राज्य राखीव पोलीस बल), संजय देवराम निकुंबे (मुंबई), दत्तात्रय रघुनाथ खंडागळे (फोर्स वन), कल्याणजी नारायण घेटे (ठाणे), चिमाजी जगन्ना आढाव, नितीन प्रभाकर दळवी (मुंबई), सहाय्यक पोलीस निरीक्षक मोतीराम बक्काजी मडावी (गडचिरोली), पोलीस उपनिरीक्षक उल्हास सिताराम रोकडे (मुंबई-पोलीस महासंचालक कार्यालय), सुनिल जगन्नाथ तावडे, सुरेश नामदेव पाटील (मुंबई), हरिश्चंद्र गणपत ठोंबरे (मुंबई-राज्य गुप्तवार्ता विभाग), संजय वसंत सावंत (रायगड), संतोष सिताराम जाधव (पुणे), सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू भिमराज कानडे (औरंगाबाद), विष्णू मैनाजी राकडे (एसीबी, औरंगाबाद), पोपट कृष्णा आगवणे (मुंबई), सुभाष श्रीपत बुरडे (नागपूर ग्रामीण), विजय नारायण भोसले, पॉल राज अ‍ॅन्थोनी (पुणे), विनोद आत्माराम विचारे, भरत कोंडीबा शिंदे (मुंबई), अनंत साहेबराव पाटील (नाशिक), सुभाष लाडोजी सावंत, नितीन बंडू सावंत (मुंबई), युवराज मानसिंग पवार (ठाणे), दिपक नानासाहेब ढोणे (औरंगाबाद), पोलीस हवालदार विष्णू बहिरु पाटील (नाशिक ग्रामीण-राज्य गुप्तवार्ता विभाग), संतू शिवनाथ खिंडे (नाशिक), आनंदा हरिभाऊ भिलारे (ठाणे), प्रतापकुमार प्रमोदरंजन बाला (चंद्रपूर) आणि शेख रशीद शेख रहिम (जालना) यांचा समावेश आहे.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments