कारण

Afghanistan News : तालिबानने काबुल काबीज केल्यानंतर पहिल्यांदा साधला माध्यमांशी संवाद…

तालिबानने मंगळवारी काबूल ताब्यात घेतल्यानंतर पहिल्या पत्रकार परिषदेला संबोधित केले.

Afghanistan News :तालिबानने मंगळवारी काबूल ताब्यात घेतल्यानंतर पहिल्या पत्रकार परिषदेला संबोधित केले. तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद म्हणाले की, कुणालाही राष्ट्राविरुद्ध ( opposite state) हल्ल्यासाठी अफगाणिस्तानचा भूभाग वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.( Taliban )

इस्लामिक कायद्याच्या “मर्यादेत” महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचे वचन दिले.काबूलमधील प्रेसिडेंशियल पॅलेसच्या आतून पत्रकार परिषदेला संबोधित करताना तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी महिलांच्या हक्कांचे संरक्षण “इस्लामिक ( islamic rules) कायद्याच्या मर्यादेत” केले जाईल असे प्रतिपादन केले.

“महिला समाजात खूप सक्रिय राहणार आहेत, परंतु इस्लामच्या चौकटीत,” अल जजीरा यांनी मुजाहिद यांच्या हवाल्याने सांगितले.

तालिबाननं रविवारी जवळपास संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. अमेरिकन सैन्याच्या माघारी परतण्याच्या निर्णयानंतर तालिबाननं मोठ्या प्रमाणात अफगाणिस्तानमध्ये पाय पसरण्यास सुरूवात केली होती. दरम्यान, मंगळवारी तालिबाननं पहिल्यांदा माध्यमांसमोर येऊन आपली प्रतिक्रिया दिली. तालिबानचा प्रवक्ता जबिहुल्ला मुजाहिद यानं माध्यमांशी संवाद साधला…( Jabihulla mujaahindh )

काय दिली आश्वासनं ?

1.अफगाणिस्तानच्या भूमिचा वापर कोणत्याही देशाविरोधात कट रचण्यासाठी आणि हल्ला करण्यासाठी दिला जाणार नाही.

2.कोणत्याही दुतावासाला किंवा संस्थेला कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचवलं जाणार नाही. त्यांना तालिबानद्वारे सुरक्षा पुरवली जाईल.

3.काबुलमध्ये असलेल्या सर्वच दुतावासांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहेत, असंही मुजाहिद यानं सांगितलं.

4 आम्ही सर्व देशांना हे आश्वासन देऊ इच्छितो की आमचं सर्व सैन्य सर्व दुतावासांचं, आंतरराष्ट्रीय संघटनांचं आणि संस्थांच्या सुरक्षेसाठी उपस्थित असेल, असंही त्यानं स्पष्ट कंलं.

5.महिलांना शरिया कायद्याप्रमाणे सूट आणि अधिकार देण्यात येईल. त्या आरोग्य विभागांत आणि शाळांमध्ये काम करू शकतील. परंतु माध्यमांमध्ये त्या काम करू शकतील का या प्रश्नावर मात्र त्यांनी फिरवून उत्तर दिलं. जेव्हा तालिबानचं सरकार अस्थित्त्वात येईल तेव्हा कोणती सूट दिली जाईल हे स्पष्ट केलं जाणार असल्याचं त्यानं सांगितलं.

6.खासगी माध्यमांना स्वतंत्ररित्या काम करण्याची परवानगी असेल. परंतु पत्रकारांना अफगाणिस्तानच्या मूल्यांचं पालन करावं लागेल.आता अफगाण युद्ध संपलं आहे. ज्यांनी यापूर्वी तालिबानविरोधात युद्ध लढलं त्यांना माफ केलं जात आहे. कोणत्याही देशाशी बदला घेण्याची तालिबानची इच्छा नाही.

7. यामध्ये माजी सैनिक आणि अफगाणिस्तानच्या सरकारच्या सदस्यांचाही समावेश आहे.

अफगाणिस्तानमध्ये कोणती कोणाचंही अपहरण करू शकणार नाही.

8. कोणी कोणाचा जीवही घेऊ शकत नाही. अफगाणिस्तानची सुरक्षा वाढवली जाणार आहे.

9.तालिबानच्या काळात देशाची अर्थव्यवस्था सुधारेल आणि लोकांचं जीवनमानही उंचावेल.

10.आमचं प्राधान्य प्रथम कायदा व्यवस्था स्थापन करणं आहे. त्यानंतर लोक या ठिकाणी सुखानं राहू शकतील असंही तालिबानच्या प्रवक्त्यानं म्हटलं.

11.तालिबानमध्ये राहणाऱ्या लोकांना कोणीही नुकसान पोहोचवणार नाही. कोणीही तुमचा दरवाजा ठोठावणार नाही, असं आश्वासनही यावेळी देण्यात आलं.

12.यापूर्वीचं सरकार कोणत्याही योग्यतेचं नव्हतं. कोणालाही त्यांना सुरक्षित ठेवत येत नव्हतं. आता तालिबान सर्वांना सुरक्षा पुरवणार असल्याचं आश्वासनही प्रवक्त्यानं यावेळी दिलं.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments