फेमस

Indian Idol12 : इंडियन आयडलचा विजेता जाहीर, चषकासह मुलीचंही जिंकलं मन

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या शोचे ग्रँड फिनाले 12 तास चालले आहे

Indian Idol12 :सोनी टेलिव्हिजनवरील ‘इंडियन आयडल’च्या इतिहासात 12 वे पर्व रविवारी (15 ऑगस्ट) रोजी हे भव्य दिव्य पध्दतीने पार पाडले. सोशल मीडियावर याचीच सर्वत्र तुफान चर्चा रंगलेली आहे. पहिल्यांदाच हा शो तब्बल 10 महिने चालू होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या शोचे ग्रँड फिनाले 12 तास चालले आहे. इंडियन आयडलच्या इतिहासात ही गोष्ट आधी कधीच घडलेली नाही. सगळ्यांचे डोळे या शोच्या निकालाकडे लागले होते.अशातच रात्री 12 वाजता या शोच्या विजेत्या स्पर्धकाचे नाव घोषित झाले आहे. ( indian idol 12 )

इंडियन आयडल 12 या पर्वाची ट्रॉफी “पवनदीप राजन ” याच्या नावावर झाली आहे.( pawandeep rajan)
यावेळी मंचावरील सोनू कक्कर, हिमेश रेशमिया आणि जज अनु मलिक सगळ्या परीक्षकांच्या हस्ते पवनदीपला इंडियन आयडल 12 ची ट्रॉफी आणि 25 लाख रुपयांचा चेक देण्यात आला.( sonu kakaar , anu malik, himesh rashmi )

पवनदीप राजन हा इंडियन आयडलमधील एक लोकप्रिय स्पर्धक होता. त्याने त्याच्या आवाजाची जादू संपूर्ण देशाला दाखवून दिलीच आहे. शोमध्ये आलेला कोणताही पाहुणा पवनदीपचे कौतुक केल्याशिवाय राहत नसे. अशातच या शोचा तो विजेता ठरला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @pawandeep_arunita_fanpage

पवनदीप हा उत्तराखंडमधील चंपावत इथला आहे.पवनदीप हा ‘इंडियन आयडॉल 12’मधला असा एकमेव स्पर्धक आहे, ज्याला गायनासोबतच जवळपास सर्व म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स वाजवता येतात.पवनदीपने याआधीही गायनाचा एक रिअॅलिटी शो जिंकला होता. 2015 मध्ये तो ‘द वॉईस ऑफ इंडिया’चा विजेता देखील ठरला होता. त्याने जवळपास 13 देशांमध्ये आणि भारताच्या 14 राज्यांमध्ये तब्बल 1200 स्टेज शो केले आहेत.

शोच्या ग्रँड फिनालेला पवनदीपसह अरुणिता कांजीलाल, शन्मुखप्रिया, सायली कांबळे, निहाल आणि दानिश खान हे 6 स्पर्धक होते.यामध्ये सहाव्या क्रमांकावर शन्मुखप्रिया, पाचव्या क्रमांकावर निहाल, चौथ्या क्रमांकावर दानिश, तिसऱ्या क्रमांकावर सायली कांबळे, तर दुसऱ्या क्रमांकावर अरुणिता कांजिलाल राहिली.प्रत्येकानेच या शोमध्ये त्यांचे शर्थीचे प्रयत्न केले, पण विजेता नेहमी कोणतरी एकच असतो. यावेळी सगळ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत होते. ( sayli kamble ,shanmukhpriya ,nihal,danish)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments