टेक

iPhone news : iPhone 13,नवीन मॉडेल मार्केटमध्ये लवकरच लॉन्च; पहा काय आहेत फिचर

iphone प्रेमींसाठी ॲपलची कंपनी पुढच्याच महिन्यात iphone13 हे नवीन मॉडेल लॉन्च करीत आहे.

iphone news : ॲपलच्या मोबाईलला सध्या मार्केटमध्ये किती मागणी आहे. हे आपल्या सर्वांना ठाऊक असून ॲपलच्या कंपनीचे फोन्स घेण्यासाठी लोकांमध्येही प्रचंडप्रमाणात उत्साह असतो.हे ही आपण जाणूनच आहोत तर अशाच सर्व iphone प्रेमींसाठी ॲपलची कंपनी पुढच्याच महिन्यात iphone13 हे नवीन मॉडेल लॉन्च करीत आहे. तर या नवीन मॉडेल ची किंमत तसेच ॲपल कंपनी iphone13 चे खास चार मॉडेल तुमच्यासाठी लॉन्च करीत आहे. चला तर मग बघूया हे चार मॉडेल आणि त्यांच्या किंमती. iPhone 13, new model launches soon in the market; See what the features are

ॲपल कंपनी या वर्षातील आपली उत्पादने दोन आठवड्यांत लॉन्च करणार असून लोक या उत्पादनांची आतुरतेने वाट पाहत आहेत. या वर्षीच्या उत्पादनामध्ये एक अहवाल सप्टेंबरमध्ये रिलीज होणाऱ्या आयफोन 13 च्या किंमतीबाबत आला आहे. ॲपल कंपनी आयफोन 13 सह अनेक उत्पादने लाँच करत आहे. जसे की आयफोन 13, आयफोन 13 मिनी, आयफोन 13 प्रो, आयफोन 13 प्रो मॅक्स हे चार मॉडेल रिलीज केले जाणार आहे. या रिपोर्टनुसार या मॉडेल्सची किंमत किती असेल ते जाणून घेऊया.

आयफोन 13 हे नवीन मॉडेल आयफोन 12 पेक्षाही कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे. आयफोन 13 मध्ये 4 जीबी रॅम देखील आहे. त्याचे 64GB वेरिएंट 71,512 रुपये मध्ये मिळू शकते, जे आयफोन 12 च्या सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 3 हजार रुपये कमी आहे. आयफोन 13 चा 128 जीबी फोन 77,254 रुपये आणि 256 जीबी फोन 86,285 रुपये मध्ये उपलब्ध होईल.

आयफोन 13 मिनीचे तीन प्रकार लाँच केले जातील. हे तीन प्रकार 4GB रॅमसह येतील परंतु त्यांचे अंतर्गत स्टोरेज वेगळे असेल. 64 जीबी अंतर्गत स्टोरेज असलेल्या आयफोन 13 ची किंमत तुम्हाला 62,472 रुपये पडेल,तर 128 जीबीची किंमत 68,132 रुपये.तसेच 256 जीबीची किंमत 77,245 रुपये एवढी असणार आहे.

आयफोन 13 प्रो आणि आयफोन 13 प्रो मॅक्स हे दोन्ही मॉडेल्स 6 जीबी रॅममध्ये उपलब्ध असतील. तिन्ही प्रकारांची मेमरी 128 जीबीपासून सुरू होते आणि 1 टीबी पर्यंत जाते.आयफोन 13 प्रो चे 128 जीबी व्हेरिएंट 96,501 रुपये, तर 512 जीबी आयफोन 1,19,212 रुपयांना असेल, 1TB स्टोरेज व्हेरिएंट 1,51,036 रुपये मध्ये मिळू शकते. आयफोन 13 प्रो मॅक्सच्या 128 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत तुम्हाला 1,05,615 रुपये,तर 512 जीबी व्हेरिएंटची किंमत 1,28,325 रुपये.1TB ची किंमत 1,60,150 रुपये इतकी आहे.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments