IPL news : IPL चं घमासान, भारताचे स्टार यूएईला रवाना, पण ipl मध्ये मोठे बदल…
IPL चा दुसरा टप्पा सुरू होण्यास फक्त 20 दिवस शिल्लक राहिले आहेत.

IPL news : भारत तसेच संपूर्ण जगामध्ये क्रिकेटला
मोठ्याप्रमाणात पसंती दर्शवतात. त्यातच भारतातही क्रिकेटचे सामने खूप लोकप्रिय आहेत.IPL सुरू होत असल्याने सर्व लोक तसेच संघातील खेळाडू ही खूप आनंदी आहे. IPL चा दुसरा टप्पा सुरू होण्यास फक्त 20 दिवस शिल्लक राहिले आहेत. बहुतांश खेळाडूंचे संघ संयुक्त अरब अमिरातीसाठी भारतातून रवाना झाले आहेत. रविवारी, विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ देखील यूएईला रवाना झाला.IPL’s Ghamasan, India’s star leaves for UAE, but big changes in IPL …
RCB त्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील मोहिम 19 सप्टेंबरपासून सुरू करणार आहे.ते अबू धाबीमध्ये KKR विरुद्ध पहिला सामना खेळणार आहेत.
IPL चा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वीच RCB संघामध्ये मोठे बदल झाले आहेत. संघाचे मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटिच यांनी राजीनामा दिल्यानंतर संघाचे ‘क्रिकेट संचालक’ माईक हेसन यांना संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे.
याशिवाय टीमने ऍडमझांपाला वगळून श्रीलंकेचा स्टार बॉलर वनिंदू हसरंगाला आपल्या टीममध्ये सामील केले आहे,तर हसरंगा व्यतिरिक्त RCB ने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुश्मंथा चमीरालाही आपल्या संघामध्ये सामील केले आहे. चमिरा ऑस्ट्रेलियाच्या डॅनियल सॅमची जागा घेणार आहे .
यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि KKR युएईला पोहोचले आहेत. दुसऱ्या लेगचा पहिला सामना दोन्ही संघांमध्ये खेळला जाणार आहे, त्यासाठी त्यांनी तयारीही सुरू केली आहे. त्याच वेळी, दिल्ली कॅपिटल्स संघाचा 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधीही संपला आहे.तसेच संघातील खेळाडू लवकरच प्रशिक्षण देखील सुरू करणार आहेत.
RCB संघाने त्यांच्या ट्विटर हँडलवर त्याचे फोटो शेअर केले आहे, ज्यात संघाच्या खेळाडूंव्यतिरिक्त प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी देखील दिसत आहेत. उड्डाणापूर्वी विमानतळावर सर्वांनी एकत्र उभे राहून या फोटोसाठी पोज दिली. तसेच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘RCB कुटुंब यूएईला रवाना झाले आहे.’ मात्र, इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळणाऱ्या संघाचा कर्णधार आणि स्टार खेळाडू विराट कोहलीला संघात सामील होण्यासाठी अजून वेळ आहे.
RCB ने या हंगामात चांगला खेळ दाखवला आहे. त्यांनी त्यांचे पहिले चार सामने सलग जिंकले आणि बहुतेक वेळा ते टेबलच्या शीर्षस्थानी राहिले. लीगच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत सात सामन्यांत पाच विजयांसह RCB तिसऱ्या स्थानावर आहे. यावेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील RCB विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करत आहेत.
हे ही वाचा :