आपलं शहर

IRCTC Offers :IRCTC कडून रक्षाबंधनानिमित्त महिलांना विशेष ऑफर

क्षाबंधन निमित्त महिला प्रवांशांसाठी विशेष कॅशबॅक ऑफर सादर केली आहे.

IRCTC Offers : भारतीय रेल्वेकडून (IRCTC) महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे.भारतीय रेल्वेची सहयोगी कंपनी इंडियन रेल्वे कॅटेरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने रक्षाबंधन निमित्त महिला प्रवांशांसाठी विशेष कॅशबॅक ऑफर (Cashback Offer) सादर केली आहे. जर एखाद्या महिलेने 15 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवास केला तर तिला 5 टक्के कॅशबॅक मिळेल. 7 ऑगस्टपासून तेजस एक्सप्रेस गाड्या पुन्हा धावू लागल्या आहेत.

प्रत्येकवेळी सर्व कॅशबॅक ऑफरमध्ये, फक्त काही नियमित व्यवहार ऑफरचा भाग असतात, परंतु यावेळी आयआरसीटीसीने त्यावर कोणतीही मर्यादा घातलेली नाही. म्हणजेच 15 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान महिलांना तेजस एक्सप्रेसने पाहिजे तितक्या वेळा प्रवास करता येणार आहे.या अंतर्गत महिला प्रवाशांना भाड्यात सूट मिळेल. ही कॅशबॅक ऑफर लखनऊ-दिल्ली आणि अहमदाबाद-मुंबईच्या दरम्यान धावणार्‍या तेजस एक्सप्रेस (Tejas Express) ट्रेन्ससाठी दिली जाईल.

सुरक्षेसाठी कोरोना प्रोटोकॉलचे पालन :

तेजस एक्सप्रेस लखनऊ-दिल्ली-लखनऊ (ट्रेन नंबर 82501/02) आणि अहमदाबाद-मुंबई-अहमदाबाद आणि (ट्रेन नंबर 82901/02) रूटवर धावत आहेत.सर्व प्रवाशांचे आरोग्य आणि सुरक्षेसाठी प्रोटोकॉलचे पालन करत रेल्वेने 7 ऑगस्टपासून आपल्या दोन प्रीमियम प्रवास गाड्यांचे पुन्हा संचालन सुरू केले आहे.

प्रवाशांना तेजस एक्सप्रेसमध्ये कोणतेही सवलतीचे तिकीट मिळणार नाही.5 वर्षांखालील मुलांचे शुल्क आकारले जाणार नाही आणि त्यांचे तिकीट फक्त पालकांसोबत केले जाईल.जर मुलाचे वय 5 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर त्याचे पूर्ण भाडे आकारले जाईल आणि त्याला एक जागाही दिली जाईल.आयआरसीटीसी सध्या आठवड्यात चार दिवस म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी दोन्ही तेजस ट्रेनचे संचालन करत आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments