फेमस

Latest News :’ती परत आली’ मधली ती नेमकी कोण, काय आहे ‘झी’चा नवा प्लॅन

लोकप्रिय मालिकेचे लेखक स्वप्नील गांगुर्डे यांनीच केलं आहे.

Latest News :झी मराठीवरील देवमाणूस Devmanus या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचं शिखर गाठलं होतं .”देवमाणूस” ही मालिका आत्ताच संपली असून प्रेक्षकांच्या भेटीला “ती परत आली” ही मालिका लवकरच येत आहे. लोकप्रिय मालिकेचे लेखक स्वप्नील गांगुर्डे यांनीच केलं आहे.

मालिकेचे प्रोमो प्रदर्शित होताच सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. या प्रोमोवरुन मालिकेत ज्येष्ठ अभिनेते विजय कदम दिसणार असल्याचे झाले स्पष्ट ते एका वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहेत. तर अभिनेता श्रेयस राजे (Shreyas Raje) या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहे.

पण त्यांच्यासोबत इतक कोणते कलाकार दिसणार हे मात्र अजूनही गुपीतच ठेवण्यात आले आहे.

प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या मनात मालिकेबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. ती नक्की कोण आहे हा प्रश्न प्रेक्षकांना सतावत होता. परंतु, या मालिकेच्या नव्याने प्रदर्शित करण्यात आलेल्या प्रोमोने तर प्रेक्षकांच्या मनात धडकी भरलेली आहे.

प्रोमोमध्ये सर्वप्रथम दोन भयानक डोळे दाखविण्यात आले. त्यानंतर तिचे ओठ , मागे वाजणाऱ्या भीतीदायक संगीतासोबत तिचा संपूर्ण चेहरा दाखवला आहे. विजय कदम एका परिसरात गस्त घालत आहेत आणि त्या परिसरामध्ये हत्या होते त्यामुळे सावध राहा अशी चेतावनी देताना दिसत आहेत. सरतेशेवटी ती एक बाहुली असल्याचं जाणवतं. परंतु, ही बाहुलीदेखील पाहायला अत्यंत भयावह असल्याने पाहणाऱ्याला खरंच तिच्यात जीव आहे असा भास होतो. तिचे मोठी बुबुळं असलेले डोळे पाहणाऱ्याच्या मनात धडकी भरवायला पुरेसे आहेत.

‘ती परत आलीये’ ही मालिका 16 ऑगस्ट पासून रात्री 10.30 वाजता प्रसारित होणार आहेत. आता ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होते का हे लवकरच कळेल. प्रेक्षकांच्या भेटीला या महिन्यात एक दोन नाही तर पाच नव्या मालिका येत आहेत. कोरोना काळाच्या पार्श्वभूमीवर बराच काळ मालिकांचे चित्रीकरण न झाल्याने जुन्या मालीकांचे जुने टेलीकास्ट केले जात होते परंतु आता लवकरच मनोरंजनासाठी अनेक मालिका समोर येणार आहेत.

;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments