मुंबईकरांना राज्य सरकारमुळे फटका, मॉल्स बंद होण्याचं मोठं कारण…
15 ऑगस्टपासून कोरोना लसीचे 2 डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करायची परवानगी दिली आहे.

काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली होती. 15 ऑगस्टपासून कोरोना लसीचे 2 डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करायची परवानगी दिली आहे. त्याचबरोबर इतर नियमही लागू करण्यात आले होते. त्यातलाच एक नियम म्हणजे 15 ऑगस्टपासून राज्यातील निर्बंधांमध्ये शिथिलथा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय ठाकरे सरकारनं घेतला होता. (Malls in Mumbai closed again due to state government conditions)
राज्यातील सर्व मॉल्स, दुकाने रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी राज्य सरकराने दिली होती, पण असं असलं तरी मुंबईतील बहुतांश मॉल्स आता पुन्हा बंद केले आहेत. राज्य सरकारने लावलेल्या अटींमुळे मॉल्स पुन्हा बंद करण्याची वेळ आल्याचं म्हटलं जात आहे.
कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण करुन 14 दिवसांचा कालावधी पूर्ण करणे, ही अट अनेक गोष्टींसाठी वैध आहे. मॉल सुरू झाले असले तरी त्यातील दुकानांमधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण अद्याप पूर्ण झाले नाही, या कारणामुळे अनेक दुकाने अजूनही बंद असल्याचंही म्हटलं जात आहे.
मॉल्स सुरु करण्याबाबत मुंबई पालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी ग्वाही दिली होती, पण त्यात लागू केलेल्या नियम आणि अटींमुळे मॉल्सवर पुन्हा बंद करण्याची नामुश्की आली आहे. त्यामुळे मॉल्स चालकांनीही राज्य सरकारला काही अटींमध्ये सूट मागितली आहे. एक डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांना मॉल्समध्ये परवानगी, मॉल्समधील कर्मचाऱ्यांचे लसीकरणासाठी प्राधान्य देणे,अशा अनेक गोष्टींबद्दल मॉल्स चालकांनी चहल यांच्यासोबत चर्चा केली आहे.
Corona update :मुंबईकरांची चिंता वाढली, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरीएंटमुळे एकाचा मृत्यू…..
corona unlock update : लहान मुलांना मॉलमध्ये नेताना सावधान, लागू शकतो दंड, किंवा…