घटना

Marathi Boards : APMC मार्केटमध्ये दिसरणार सगळीकडे मराठीचे फलक, लवकर होणार कामाला सुरुवात

मुंबईत मराठी एकीकरण समितीतर्फे एपीएमसी मार्केटमध्ये गुजराती आणि हिंदी वापराविरोधात आंदोलन करण्यात आले होते.

Marathi Boards : मुंबईत मराठी एकीकरण समितीतर्फे एपीएमसी मार्केटमध्ये गुजराती आणि हिंदी वापराविरोधात आंदोलन करण्यात आले होते. याबाबत आमदार शशिकांत शिंदेंनी माथाडी भवनात संबंधित लोकांची बैठक घेतली. यावेळी मराठी एकीकरण समितीने मराठी फलकांविषयी आवाज उठवला.

इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषेचा केला जाणारा वापर तसेच शेतकरी आणि ग्राहकांना येणाऱ्या अडचणी याबाबत मराठी एकीकरण समितीने आपले मतं मांडले होते. परराज्यातील कामगारांची आणि असंघटीत मजुरांची नोंदणी बाजार समितीकडे केली जावी, अशीही मागणी करण्यात आली. तसेच परराज्यातील लोकांची नोंदणी गृहविभागाकडे देखील नोंदवण्यात यावी. अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. मराठी एकीकरण समितीची बाजू लक्षात घेऊन येत्या दोन महिन्यात एपीएमसीच्या पाचही बाजारपेठांमध्ये लवकरच पूर्णपणे मराठीचा वापर आणि कामगारांची नोंदणी केली जाईल, असा विश्वास आमदार शशिकांत शिंदेंनी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना दिला आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य आणि मसाला मार्केटमध्ये 2 हजार व्यापारी आहेत. या मार्केटमधील खरेदी, विक्री संबंधीत ग्राहकांना देण्यात येणारे बिले ही गुजराती, हिंदी भाषेत दिली जातात. तसेच दुकानावरील फलक मराठीत नसल्याने नेमक्या दुकानाचा शोध घेताना ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ग्राहकांशी मराठीत संवाद साधला जात नाही. अनेक वेळा शेतकऱ्यांची, ग्राहकांची अडचण होते. शिवाय व्यापाऱ्यांकडून देण्यात येणारे बिल मराठी भाषेत नसल्याने ग्राहकांना समजत नाही. अन्न धान्याचे प्रकार समजत नाहीत. गेली अनेक वर्ष सामान्य ग्राहकांना या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समितीचे कार्याध्यक्ष प्रदीप सामंत यांनी सांगितले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments