खूप काही

Mhada home : म्हाडाची बम्पर ऑफर, 9000 घरांची निघणार लॉटरी; पहा लोकेशन

सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न स्वप्नच राहणार असल्याचे चित्र होते. मात्र, आता म्हाडाने सर्वसामान्य व्यक्तीला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

Mhada home : गेल्या काही वर्षांपासून कोरोना या प्रमुख कारणांसह उर्वरित कारणांमुळे दोन्ही मंडळांची घराची लॉटरी निघत नव्हती. त्यातल्या त्यात कोकण मंडळाकडून घराच्या लॉटरीची आशा होती. मात्र, अनेक दिवस याबाबत हालचाली होत नव्हत्या. त्यामुळे यंदा सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न स्वप्नच राहणार असल्याचे चित्र होते. मात्र, आता म्हाडाने सर्वसामान्य व्यक्तीला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

सर्वसामान्यांच्या घरांचं स्वप्न सत्यात उतरवणारी म्हाडा यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर घरांची लॉटरी काढणार असून, या लॉटरीच्या माध्यमातून नऊ हजार घरं विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. म्हाडाचे कोकण मंडळाकडून याबाबतची जाहिरातदेखील लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर या घरांच्या लॉटरीची सोडत काढली जाणार आहे. लॉटरीमध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 6500 घरं आणि कोकण मंडळ आवास परियोजनेंतर्गत 2000 आणि 20 टक्के योजनेंतर्गत 500 घरांचा समावेश आहे.

म्हाडाचे कोकण मंडळ 9000 घरं विक्रीसाठी उपलब्ध करून देणार,दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हाडाचे कोकण मंडळ 9000 घरं विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहे.ही घरं निम्न आणि मध्यम वर्गीयांच्या आवाक्यातील असणार आहे. ठाणे, मीरा रोड, वर्तकनगर, विरार बोळिंज नाका, कल्याण, वडवली आणि ठाण्याच्या गोथेघरमध्ये ही घरं उपलब्ध होणार आहेत. मीरा रोडमध्ये मध्यम वर्गीयांसाठी 2 बीएचके 196 घरं आहेत. ठाण्यातील वर्तकनगरमध्ये 67 दुकानं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यांची किंमत जवळपास 38 लाख ते 40 लाखांच्या घरात असतील.

कोकण मंडळाच्या लॉटरीनुसार, वडवली येथे 20, कासारवडवली 350 घरे अल्प उत्पन्न गटासाठी असून, या घरांची किंमत 16 लाखांच्या जवळपास राहणार आहे. ठाण्यातील वर्तक नगर येथे अल्प उत्पन्न गटासाठी 67 घरे असणार असून, या घरांचे क्षेत्रफळ 320 चौरस फूट आहे. या घराची किंमत 38 ते 40 लाखांच्या आसपास असेल.

विरार येथे 1 हजार 300 घरे उपलब्ध असतील. यात एक हजार घरे अल्प आणि बाकीची घरे मध्यम उत्पन्न गटासाठी असतील. कोकण विभागीय मंडळ तब्बल 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता 9 हजार घरांसाठी सोडत जाहीर करणार आहे. कोविड 19 संकटामुळे म्हाडाची ही लॉटरी लांबणीवर पडली होती. यंदाच्या वर्षी 6500 घरं ही प्रधानमंत्री आवास योजना, 2000 घरं ही मंडळाची तर 500 घरं इतर काही प्रोजेक्ट्सचा भाग म्हणून समाविष्ट करण्यात आली आहेत.

 

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments