आपलं शहर

Mhada homes : म्हाडाचा मोठा निर्णय, कोकण मंडळाच्या घरांची संख्या वाढणार…

ठाणे जिल्ह्यातील आणखी 700 घरांचा समावेश या सोडतीमध्ये करण्याचे नियोजन मंडळाने केले आहे.

Mhada homes : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत 8 हजार 205 सदनिकांची सोडत काढण्याची घोषणा मंडळाने केली आहे.ठाणे जिल्ह्यातील आणखी 700 घरांचा समावेश या सोडतीमध्ये करण्याचे नियोजन मंडळाने केले आहे. या घरांचा सोडतीच्या जाहिरातीमध्ये समावेश करण्यास उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी तयारी दर्शविली असल्याची माहिती मंडळातील सूत्रांनी दिली.Mhada homes: MHADA’s big decision, the number of Konkan Mandal houses will increase …

कोकण मंडळाने 8 हजार 205 सदनिकांसाठी सोडत काढण्याची घोषणा केली आहे. या सोडतीची जाहिरात 23 ऑगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात येणार असून 14 ऑक्टोबर रोजी सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी 6 हजार 195 घरे, अल्प उत्पन्न गटासाठी 1 हजार 775, मध्यम उत्पन्न गटासाठी 234 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 1 अशी एकूण 8 हजार 205 घरांचा समावेश आहे.

त्याप्रमाणे सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या सोडतीमध्ये अतिरिक्त घरांची भर पडेल असेही सूत्रांनी सांगितले. या घरांचा समावेश सोडतीमध्ये झाल्यास घरांची 8 हजार 900 हुन अधिक होईल. याबाबत मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन यांनी बोलण्यास नकार दिला. सोडतीची जाहिरात 23 ऑगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात येणार असून अर्ज भरण्यास मंगळवार (ता.24) पासून होणार आहे.या सोडतीमध्ये आणखी 700 घरांचा समावेश करण्याची तयारी मंडळाने केली आहे.

यामध्ये 6 हजार 180 घरे पंतप्रधान आवास योजनेतील आहेत. ठाणे जिल्हयातील शिरढोण, खोणी, भंडार्ली, गोठेघर, मिरारोड येथे, पालघर जिल्ह्यातील विरार बोळींज व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील घरांचा समावेश आहे.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments