आपलं शहर

Mumbai police news : मुंबई पोलिसांचा भन्नाट बँड, तुम्हीही उभे राहून वाजवाल टाळ्या…

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये चक्क मुंबई पोलिस सूर लावताना दिसत आहेत .

Mumbai police news :अनेकदा आपण गाण्याची धून ऐकल्यानंतर पुढची ओळ सांगण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. एवढेच नाही तर बऱ्याच वेळा जर आपण सकाळी काही चांगले संगीत ऐकले तर ते संगीत दिवसभर गुणगुणत असतो. सोशल मीडियावर असे अनेक कलाकार पाहायला मिळतील, जे अनेकदा गायनाचे व्हिडीओ इंटरनेटवर शेअर करतात.Mumbai Police’s abandoned band, you too should stan

या दरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये चक्क मुंबई पोलिस सूर लावताना दिसत आहेत . मुंबई पोलिसांची ही धून ऐकण्यासाठी लोक पुन्हा पुन्हा ऐकायला उत्सुक होत आहेत. मुंबई पोलिसांच्या हाच व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये मुंबई पोलिसांच्या संगीत संघाने जबरदस्त धून वाजवून लोकांची मने जिंकली आहेत. या व्हिडिओमध्ये, मुंबई पोलिसांच्या बँड टीमने हॉलीवूडचा लोकप्रिय चित्रपट ‘जेम्स बाँड’ चे थीम संगीत वाजवले आहे. हा सूर वाजवताना मुंबई पोलिसांच्या बँडची ही टीम खूप उत्साही दिसत आहे.

उद्योगपती हर्ष गोएंका यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हर्ष गोयनका यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आमच्या मुंबई पोलिसांनी नेहमीच जेम्स बाँडची भूमिका बजावली आहे. जे वाईट गोष्टी करणाऱ्या लोकांना पकडण्याच्या उद्देशाने धावत आहेत.

या व्हिडिओमध्ये त्यांना जेम्स बाँड चित्रपटाचे अप्रतिम संगीत वाजवताना पाहूया. हर्ष गोयंकाचा हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला असून लोकांनी याव्हिडिओ खूप पसंती दर्शवली आहे. नेटिझन्सही मुंबई पोलिसांची जोरदार स्तुती करत आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments