आपलं शहर

MPSC UPDATE : एमपीएससीमधील रिक्त पदे भरण्याचा निर्णय…

MPSC UPDATE : गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे एमपीएससी परीक्षा रद्द केल्या होत्या त्यामुळे अनेक विद्यार्थी हे नाराज झाले होते

MPSC UPDATE : राज्य शासनातील एमपीएससीमधील पदांच्या भरतीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

28 जुलै रोजी झालेल्या बैठकीनंतर अवघ्या दोन दिवसातच म्हणजे 30 जुलै रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदांसाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात यावी असा निर्णय जारी झाला आहे.

गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे एमपीएससी परीक्षा रद्द केल्या होत्या त्यामुळे अनेक विद्यार्थी हे नाराज झाले होते. म्हणूनच एमपीएससीची रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित विभागांनी योग्य नामावली तयार करून व त्यांना उचित मान्यता देऊन 30 सप्टेंबरपर्यंत एमपीएससीकडे प्रस्ताव पाठवण्याचे शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.

बैठकीला सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक, लेखा व कोषागर विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबईच्या सचिव स्वाती म्हसे पाटील आदी उपस्थित होते.

बैठकीमध्ये एमपीएससीच्या पदभरती संबंधातील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर तातडीने हा निर्णय जारी करण्यात आला आहे. कोरोना संकटामुळे केवळ सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील पदांच्या भरतीला मान्यता दिली होती. त्यामुळे दि.4 मे 2020 आणि दि. 24 जून 2021च्या शासन निर्णयानुसार राज्यातील इतर विभागातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेवर निर्बंध होते.

ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालाचा विचार करून, राज्यातील कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या होत्या. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली आहे ही रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित विभागांनी 30 सप्टेंबर रोजी रिक्त पदांचा प्रस्ताव पाठवल्याचा सांगण्यात आल्याने एमपीएससीची रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अजित पवार यांनी राज्यात 15 हजार 500 हून अधिक पदांची भरती करण्याचे विधिमंडळात जाहीर केले आहे त्या प्रक्रियेला या निमित्ताने सुरुवात झाली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments