फेमस

Mrunmayee Deshpande : मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री लवकरच दिसणार मोठ्या पडद्यावर

मृण्मयीच्या एका व्हिडीओचीही जबरदस्त चर्चा रंगली.

Mrunmayee Deshpande :मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी (mrunmayi Deshpande) देशपांडे हिने चित्रपटात विविध भूमिका साकारून चाहत्यांचा मनावर अधिराज्य गाजविले आहे. मृण्मयीच्या एका व्हिडीओचीही जबरदस्त चर्चा रंगली. मृण्मयी देशपांडेने नुकतेच मराठमोळ्या साजातील फोटो इंस्टाग्रामवर (Instagram photoshoot) शेअर केले आहेत. हे फोटोशूट चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारे आहे.

मराठी ओटीटी’वर रिलीज होणाऱ्या वेबसिरीज ( webseries ) सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.आत्ताच्या काळात डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचार्यांना रात्रंदिवस नि:स्वार्थीपणे काम करताना पाहिले. विशेषत: अशा कठीण काळात लोकांचे जीव वाचवताना पाहिले आहे . परंतु या दृश्याची खऱ्याखुऱ्या हिरोंशिवाय आपण आयुष्यात कल्पनाच करू शकत नाही.अशयाच एक कहाणी निखिल अडवाणी दिग्दर्शित आणि एमी एंटरटेंमेंटच्या मोनिशा अडवानी आणि मधु भोजवानी यांनी निर्मिती केलेली ‘मुंबई डायरीज 26/11 ही मालिका आहे.(Mumbai diaries 26 level new series)

मुंबईत 26/11ला झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शहीद झालेल्यांना रूग्णांना अत्यावश्यक सेवेत तत्पर असणाऱ्या कर्मचार्यांच्या शूरतेची व धाडसाची ही कहाणी आहे. या मालिकेमध्ये शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचारावर आधारित ही कथा आहेत. मालिकेत संपूर्ण मुंबई शहरात कार्यरत असलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यां समोर उभी ठाकलेली आव्हाने आणि त्यावर कर्मचाऱ्यांनी केलेली मात याविषयी भाष्य केले असून त्या परिस्थितीत एक चित्र आपल्या डोळ्यासमोर चित्रीत केले आहे.

या मालिकेत कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टीना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजित दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलवडी हे कलाकार यात भूमिका निभावणार आहे. (Coconut Sen Sharma Mohit Raina Tina Desai Satyajeet Dubey Natasha Bharadwaj )

काही दिवसांपूर्वी मृण्मयीने ‘सोप्पं नसतं काही’ या वेबसीरिजचा ट्रेलरही शेअर ही केला आहे. यात मृण्मयीच्या आयुष्यात शशांक आणि अभिजीत असे दोन पुरुष यात दिसत आहेत.प्लॅनेट मराठी ओटीटी वर 31 ऑगस्टपासून ही वेब सीरिज प्रेक्षकांना पाहता येईल.

;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments