आपलं शहर

Mumbai COVID-19 News: मुंबईची कोरोनाच्या तिसऱ्या लाटेकडे वाटचाल, पहा कशी झाली सुरुवात

फक्त दोन दिवसांत नव्या रुग्णांची संख्या ही दुप्पट झाली आहे

Mumbai COVID-19 News :महाराष्ट्रातील राज्यात कोरोनाचा तिसऱ्या लाटेमध्ये पुन्हा एकदा रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते .पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा आणि मृतांचा आकडा गेल्या काही दिवसांच्या तुलनेत थोडा वाढला आहे.कोट्यावधी लोकांनी कोरोनाची लस घेतली असताना दरम्यान टेन्शन वाढलं आहे. कारण फक्त दोन दिवसांत नव्या रुग्णांची संख्या ही दुप्पट झाली आहे.

तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या तब्बल 60 लाखांच्या वर जाऊन शकते, तर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने तिसऱ्या लाटेत परिस्थिती पाहता योग्य पावलं उचलली असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. रूग्णांच्या संख्येमध्ये चढ-उतार होताना दिसत असून त्यामुळे नागिरकांनी स्वतः ची दक्षता घ्यायली हवी असा सतर्कतेचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

मुंबईत तिसऱ्या लाटेत तब्बल 1.36 लाख रुग्ण संख्या वाढीचा अंदाज स्पष्ट करण्यात आला आहे. यात 88 हजार 823 रुग्णांना होम क्वारंटाइन, 47 हजार 928 रुग्णांना रुग्णालयात तर ‌ 957 रुग्णांसाठी अतिदक्षता विभागातील खाटांची व्यवस्था केली जाईल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएंट अधिक संक्रमीत झाल्याचे पहायला मिळाल . मुंबईत दिवसाला 1 लाख 36 हजार रुग्ण वाढू शकतात. .

कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली असताना फक्त दोन दिवसांत नव्या रुग्णांची संख्या ही दुप्पटीने वाढत आहे. मुंबईमध्ये जर रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली,तर मुंबईमधील रुग्णालयांत ऑक्सिजनची मोठी कमतरता भासू शकते .तिसऱ्या लाटेत मुंबईला 250 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज निर्माण होण्याचा अंदाज आरोग्य विभागाने वर्तवला आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments