आपलं शहर

Mumbai local news : लसीचे दोन डोन न घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनाही लोकल पास नाही…

मुंबईतील लसीकरण मोहिमेच्या वेगावरच लोकल मधील गर्दी अवलंबून आहे. त्यामुळे येत्या काळात लोकलची गर्दी वाढतच जाण्याची शक्यता आहे.

Mumbai local news : मुंबईतील लसीकरण मोहिमेच्या वेगावरच लोकल मधील गर्दी अवलंबून आहे. त्यामुळे येत्या काळात लोकलची गर्दी वाढतच जाण्याची शक्यता आहे. मुंबईत सध्या एका दिवसात सरासरी दीड लाख लोकांचं लसीकरण होत आहे. त्यात लोकलचा मासिक पास काढण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. त्यामुळेच लोकल सेवा पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या सूचनेनुसार 15 ऑगस्टपासून कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या लसवंतांना लोकल प्रवासाची मुभा दिली आहे. मात्र, आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना सुद्धा कोरोना लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र (corona vaccination certificate) रेल्वेच्या तिकीट खिडक्यावरील रेल्वे कर्मचारी विचारत आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे..
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर शासनाने तात्काळ यात लक्ष घालून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेचे तिकीट आणि पास तत्काळ मिळावेत, असे आदेश द्यावेत, अशी मागणी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

वैध ओळखपत्र दाखवून सुद्धा तिकिट नाकारले जात आहे. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थपकांनी यामध्ये लक्ष देऊन राज्य आणि केंद्र सरकारमधील कर्मचाऱ्यांनी वैध ओळखपत्र दाखविल्यास त्यांना लोकल तिकिट किंवा मासिक पास द्यावा, असे पत्रात म्हटले होते.

रेल्वे आणि राज्य सरकार यांच्या समन्वयाअभावी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात तिकीट आणि पास घेण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे.आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाकडून 5 ऑगस्ट रोजी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांशी पत्रव्यवहार करून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पास आणि तिकिट मिळत नसल्याने खंत व्यक्त केली होती.

24 जून 2021 च्या परिपत्रकानुुसार राज्य आणि केंद्रामधील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी आहे. मात्र, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अनेक स्थानकावर राज्य आणि केंद्र सरकारमधील कर्मचाऱ्यांना लोकलचे तिकिट किंवा मासिक पास मिळत नाही. त्यानंतर रेल्वेने सुद्धा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना तिकिट खिडकीवर पास आणि तिकीट मिळावे, यासाठी तिकीट खिडक्यावर सूचना दिल्या होत्या. मात्र, लसवंतांना लोकल प्रवासाची मुभा दिल्याने पुन्हा एकदा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लसीच्या प्रमाणपत्राची विचारपूस केली जात आहे.

 

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments