खूप काही

Mumbai local : रेल्वे प्रवासासाठी ऑफलाईन पद्धतीबाबत नियोजन,65 स्थानकावर दिले जाणार ओळखपत्र..

कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येणार असल्याचे रविवारी 8 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येणार असल्याचे रविवारी 8 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.

Mumbai local : कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येणार असल्याचे रविवारी 8 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. हा निर्णय घेताना केंद्राला विश्वासात घेतले नसल्याचा सूर लावण्यात आला होता. मात्र, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल लाहोटी, विभागीय रेल्वे व्यवस्थापक हे गुरुवारी स्वत: आयुक्तांच्या दालनात चर्चेसाठी आले होते. लोकल सुरू करण्याबाबत एक तास चर्चा झाली. या चर्चेची संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली होती, असे आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले.

रेल्वेशी चर्चा करूनच लोकल सुरू करण्याची तयारी – पालिका आयुक्त सर्व महत्त्वाच्या रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी 9 ऑगस्ट रोजी स्पष्ट केले. लोकल सुरू करण्याचा निर्णय जाहीर करण्याआधी रेल्वेबरोबर चर्चा करायला हवी होती, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले होते. त्यानंतर, आयुक्तांकडून हे स्पष्टीकरण समोर आले आहे.

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेनने प्रवास करता यावा, यासाठी खास अ‍ॅपचा वापर केला जाणार आहे. राज्य सरकारकडून तयार करण्यात येणाऱ्या या अ‍ॅपचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे अ‍ॅप येत्या दोन दिवसांत कार्यरत होईल. मुंबईतील 65 रेल्वे स्थानकांवर या अ‍ॅपच्या माध्यमातून तिकीट-पाससाठी क्युआर कोड दिला जाईल. तर वॉर्ड स्तरावर ऑफलाईन सेवेच्या माध्यमातून तिकिटासाठी क्युआर कोड मिळवता येईल.

मुंबईत रेल्वेने दररोज 80 लाख प्रवासी प्रवास करीत असतात. आतापर्यंत मुंबईतील 19 लाख नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे, तर ठाणे, वसई-विरार, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, अंबरनाथ, मीरा-भाईंदर अशा दहा महापालिका मिळून 13 लाख असे 32 लाख प्रवासी आहेत. दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत राहणार आहे. क्युआर कोड मिळविण्यासाठी या प्रवाशांची विभाग कार्यालयात गर्दी होऊ नये, तसेच अन्य पात्र प्रवाशांच्या सोयीसाठी 65 रेल्वे स्थानकांवर व्यवस्था केली जाणार आहे.याबाबत इक्बालसिंह चहल म्हणाले, “काल संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत. ज्यांनी दोन डोस घेतले आहेत, त्यांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येईल, मात्र दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवस व्हावे लागतील, त्यानंतरच हा पास मिळेल”

येत्या काळात शिथील झालेल्या निर्बंधाचा लाभ घेण्यासाठी हा फोटोपास आत्यावश्यक असेल. रेस्टॉरंट, जीम, मॉल अशाठिकाणी देखील अशा पासची गरज पडेल. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर लस घेणे गरजेचे असेल. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत मुंबईतील 18 वर्षावरील 90 लाख लोकांचे दोन्ही डोस पूर्ण होतील, असा विश्वास आयुक्त इक्बाल चहल यांनी व्यक्त केला.

ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, तसेच दुसरा डोस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना 15 ऑगस्ट 2021 पासून उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतांना नागरिकांनी संयम बाळगावा, गर्दी करू नये, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून कोरोनाला हरवण्याची जिद्द मनात कायम ठेवावी असे आवाहन केले.

कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्याकरिता ओळखपत्र देण्यासाठी अ‍ॅप तयार करण्यात येत आहे. त्यानंतर, महापालिकेच्या विभाग कार्यालयांबरोबरच 65 रेल्वे स्थानकांवर हे ओळखपत्र दिले जाणार आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने क्युआर कोडचे ओळखपत्र संबंधित प्रवाशांना मिळेल, अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे मुंबई पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी 9 ऑगस्ट रोजी सांगितले.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments