आपलं शहर

Mumbai Local Restart | मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु, वाचा नियम आणि अटी

Mumbai Local Restart | गेल्या काही दिवसांपासून मुंबई लोकल सुरु करण्याची मागणी केली जात होती, मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर दिलं आहे. येत्या 15 ऑगस्टपासून मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु केली जाणार असल्याचं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या facebook live मधून मांडलं आहे. ((Mumbai Local for all, read the terms and conditions)

ज्या नागरिकांनी कोरोना लसीचे 2 डोस घेतले आहेत, त्यांच्यासाठी ही लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. मुंबई मनपाकडून एक अॅप सुरु करण्यात आलं आहे. त्या अॅपमध्ये दोन लसी घेणाऱ्यांनी नोंदणी करायची आहे, त्यानंतर पालिकेकडून एक बारकोड दिला जाईल, ज्या नागरिकांकडे पालिकेने दिलेला बारकोड असणार आहे, त्या नागरिकांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी मिळणार आहे.

बारकोडच्या माध्यमातून मुंबई लोकलचा पास मिळू शकणार आहे. मात्र हे सगळं सांगताना मुख्यमंत्र्यांनी जनतेला एक आवाहन केलं आहे. कोरोनाच्या संकटाला दूर करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करु असं आवाहनदेखील मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं आहे.

सर्वप्रथम ज्या नागरिकांचे तळहातावर पोट आहे, त्यांनी सर्वात आधी पास घेऊन आपलं काम सुरु करावं. ज्या नागरिकांकडे फोन नाही, त्यांनी पालिकेच्या विभागीय कार्यालयात जाऊन नोंदणी करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. (Mumbai Local Restart)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments