आपलं शहर

Mumbai Local Update : रेल्वेचा मासिक सिझन पास कसा मिळवावा; जाणून घ्या माहिती

15 ऑगस्टपासून उपनगरी रेल्वेतून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. 

Mumbai Local Update : कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना 15 ऑगस्टपासून (15 August ) उपनगरी रेल्वेतून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

कोव्हीड लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे( uddhav thakrey) यांनी रविवारी केली होती. तर

महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंगळवारी प्रमाण कार्यप्रणाली (SOP) जारी केली आहे.

लशीच्या दोन मात्रा घेऊन 14 दिवस झालेल्यांना उपनगरी रेल्वेतून प्रवासाची मुभा देण्यात आली असून ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल केल्यावर मिळणारे ‘युनिव्हर्सल क्युआरकोड’ ( universal QR code) ओळखपत्र असलेल्यांना लसीकरण प्रमाणपत्र ( certificate) सोबत ठेवण्याची  आवश्यकता आहे.

अश्याच नागरिकांना मासिक सिझन पासवर प्रवास करण्याची परवानगी असणार आहे.दैनंदिन तिकीटासाठी ही सुविधा मिळणार नसल्याचेही सरकारने स्पष्ट सांगितले आहे. (Daily tickets not allowed)

प्रवास करताना प्रवाशांनी मासिक सिझन पाससोबत युनिव्हर्सल पासही सोबत ठेवणे आवश्यक आहे.बुधवारपासून प्रवाशांची लसीकरणाचे प्रमाणपत्र आणि छायाचित्र असलेले ओळखपत्र (आधार कार्ड) ( addhar card ) रेल्वे स्थानकातील मदत कक्षातील कर्मचाऱ्यांकडून तपासून घ्यावीत.

नवी मुंबई येथील महापालिका आयुक्त अभिजीत बांगर ( Navi Mumbai mahapalika member Abhijit bangar)  यांच्या मार्गदर्शनानुसार बेलापूर, सीवूड, नेरुळ, जुईनगर, सानपाडा, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, रबाडे, ऐरोली या रेल्वे स्थानकावर ही मदत केंद्रे सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मासिक पास कसा मिळवावा:

मासिक सिझन पास घेण्याची इच्छा असलेल्या व लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवस झालेल्या नागरिकांना प्रमाणपत्राची प्रत व आधार कार्डची प्रत घेऊन रेल्वे स्टेशनवरील महानगरपालिकेच्या विशेष मदत कक्षाशी संपर्क साधून मदत कक्ष प्रमाणपत्रावरील क्यू आर कोड स्कॅन (Qr cord ) करुन त्यावर विशेष शिक्का देऊन लसीकरणाचे प्रमाणपत्र युनिव्हर्सल पाससाठी प्रमाणित करतील. त्यावरून आवश्यक दस्तावेजांच्या माध्यमातून युनिव्हर्सल ओळखपत्र दिले जाणार असून अन्य ओळखपत्राप्रमाणे याचा उपयोग करून रेल्वे पास काढता येईल.

कोव्हीडचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत व ज्यांना लोकल ट्रेनने प्रवास करावयाचा असल्यास अशा नागरिकांची युनिव्हर्सल पासविना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये याकरीता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व 11 रेल्वेस्टेशनवर 11 ऑगस्टपासून कार्यान्वित विशेष मदत कक्षाचा लाभ नागरिकांनी घेता येणार आहे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

या विशेष मदत कक्षाची कार्यवाहीकरीता ( helpline care centre)सकाळी 7 ते दुपारी 3 आणि दुपारी 3 ते रात्री 11 अशा दोन सत्रात असून या करीता 100 हून अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

याशिवाय लवकरच युनिव्हर्सल पास देणेबाबत ऑनलाईन ॲपदेखील शासनाच्या वतीने कार्यान्वित करण्यात येतील अशी माहिती दिली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments