आपलं शहर

Mumbai News :मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयाला अमेरिकेकडून मोठी भेट

कोविड संसर्गाच्या सध्याच्या कालावधीत कोविड विषाणूचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत

Mumbai News :कोविड संसर्गाच्या सध्याच्या कालावधीत कोविड विषाणूचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. अशा स्थितीत जीनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये ( jinom sikvensingh )वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करुन उपचारांना वेग देणे शक्य झाले आहे.तर जनतेने आपल्या सुरक्षेसाठी मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर राखणे, हातांची नियमित स्वच्छता, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात, असे विनम्र आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ( bmc) वतीने करण्यात येत आहे.

मुंबईत आज 226 नवीन रुग्ण सापडले. कोविड-19 विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण करणारी वैद्यकीय यंत्रणा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात (kasturbha hospital) केली असून तेथील चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत.डेल्टा प्रकारातील कोविड ( delta covid) विषाणूची वेगाने होणारी लागण लक्षात घेता, कोविड-19 विषाणू प्रतिबंधक निर्देशांचे पालन प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या कस्तुरबा रुग्णालयात विषाणुंचे जनुकीय सूत्र निर्धारण वैद्यकीय प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे.या प्रयोगशाळेतील चाचणीत पहिल्या तुकडीतील एकूण 192 नमुन्यांमध्ये 128 रुग्ण हे ‘डेल्टा’ प्रकारातील कोविड विषाणूने बाधित झाले आहे. उर्वरित नमुन्यांमध्ये अल्फा प्रकाराचे 2 केपा प्रकाराचे 24 तर इतर रुग्ण हे सर्वसाधारण कोविड विषाणूने बाधित झालेले आहे.

विषाणूंचे जनुकीय सूत्र निर्धारण केल्याने, एकाच विषाणूच्या दोन किंवा अधिक प्रजातींमधील नेमका फरक ओळखता येतो. असा फरक ओळखू आल्यानंतर उपचार पद्धतीची नेमकी दिशा स्पष्ट होते. कस्तुरबा रुग्णालयातील जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये एकाचवेळी सुमारे 384 वैद्यकीय नमुन्यांची तपासणी होऊन 4 दिवसांच्या आत वैद्यकीय निष्कर्ष प्राप्त होऊ शकतात.

या वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये  ( lab school)जनुकीय सूत्र निर्धारण करणारी दोन संयंत्र उपलब्ध आहेत. अमेरिकेतील इलुम्निया या कंपनीने, अमेरिकेतीलच अल्ब्राईट स्टोनब्रिज ग्रुप (ए. एस. जी. – बोस्टन) या संस्थेच्या माध्यमातून एकूण 6 कोटी 40 लाख रुपये किंमतीचे हे 2 जीनोम सिक्वेसिंग संयंत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेला दान स्वरुपात दिलेल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 4 ऑगस्ट 2021 रोजी त्याचे लोकार्पण करण्यात आले.( Cm uddhav Thackeray)

 

 हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments