Mumbai News : कोरोना रूग्ण संख्येत घट तर मुंबईत दुसऱ्यआ रोगाच्या रुग्णांची वाढ
मुबंईला गेल्या अनेक वर्षांपासून मलेरिया रोगाचा सर्वात जास्त धोका आहे

Mumbai News : कोरोनाचा प्रसार कमी झाला असताना आता दरवर्षी प्रमाणे मलेरिया, डेंग्यू या साथीच्या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. मुबंईला गेल्या अनेक वर्षांपासून मलेरिया रोगाचा सर्वात जास्त धोका आहे.(Mumbai malaria )
मुंबईत पाऊस सुरु झाल्यानंतर अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे मच्छरांची (mosquitoes) संख्या वाढताना दिसते .डासांची उत्पत्ती नष्ट करण्यासाठी महापालिकेच्या विभागाने सफाई मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत साडेसात महिन्यांच्या कालावधीत मलेरियाचे 7 हजार 922 तर डेंग्यू वाहक 39 हजार 481 डासांचे अड्डे पालिका कर्मचारानी नष्ट केलेली आहेत.ऑगस्ट महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत मलेरियाचे 395 रुग्ण तर डेंग्यूचे 61 रुग्ण आढळून आले आहेत. या
तर बराच ठिकाणी र्ऍनॉफिलीस स्टिफेन्सी'( anofilis stiffens ) डासांच्या अळ्या आढळून तसेच, डेंग्यू विषाणू वाहक डासांच्या अळ्या प्राधान्याने पाण्याचा पिंप, फेंगशुई झाड, बांबू प्लॅन्ट्स, मनीप्लँट्स यासारखी शोभिवंत झाडे; घराच्या सज्जामध्ये (गॅलरी) किंवा सभोवताली झाडांच्या कुंड्यांमधील अतिरिक्त पाणी जमा होण्यासाठी ठेवण्यात येणा-या ताटल्या (प्लेट्स), वातानुकुलन यंत्रणा, शीतकपाटाचा (रेफ्रिजरेटर) डिफ्रॉस्ट ट्रे यासारख्या विविध स्रोतांमध्ये अल्प प्रमाणात असलेल्या स्वच्छ पाण्यात देखील या डासांची उत्पत्ती आढळून आलेली आहे.
डासांच्या प्रत्येक उत्पत्तीस्थानाच्या ठिकाणी एकावेळी एक मादी डास 100 ते 150 अंडी घालते. म्हणजेच एका मादी डासामुळे साधारणपणे 400 ते 600 डास तयार होत असतात. हे डास डेंग्यू / मलेरिया सारख्या आजारांच्या प्रसारास कारणीभूत असतात.
मलेरिया-डेंग्यूची लक्षणे काय ? ( Malaria, dengu )
मलेरिया लक्षणे – ताप येणे, घाम येणे
डेंग्यूची लक्षणे – ताप येणे – डोके दुखणे – सांधे दुखी – पोट दुखी – उलट्या होणे – हिरड्यांमधून रक्त येणे सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी रक्त साखळण्याचे प्रकार, प्लेटलेट्सचे प्रमाण झपाट्याने कमी होते, डोळे लाल होणे.