बीएमसी

Mumbai News: जनतेला मिळाला दिलासा, दादरमध्ये उभारलं वाहन चार्जिंग स्टेशन

महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला थोडासा दिलासा आता मिळणार आहे.

Mumbai News : दररोजचा पेट्रोल डिझेलचा वाढता दर सर्व सामान्यांना परवडणारा नाही. पेट्रोल 107 रूपये तर डिझेल 97 रूपये इतका आहे.कोरोनाच्या अवघड परिस्थितीत नागरिकांना कामधंदा नसताना अशा परिस्थितीत महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला थोडासा दिलासा आता मिळणार आहे.( Petrol diesel price in mumbai )

डिझेल, पेट्रोल वाहनांच्या वाढत्या प्रदूषणावर इलेक्ट्रिक वाहने उतारा ठरत आहेत. जगभर या वाहनांना मागणी वाढली असून मुंबईतही या वाहनांची संख्येत वाढ व्हावी , यासाठी महापालिकेने दादर येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले.( dadar charging station)

मुंबईत दादर येथे शिवसेना भवनजवळ असलेल्या कोहिनूर टॉवरमध्ये पालिकेचे मोठे ‘पे अॅण्ड पार्क’ या ठिकाणी चार्जिंग स्टेशन सुरू केले आहे . पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले.ही इलेक्ट्रिक वाहने पूर्णपणे विजेवर चालतात व त्याचा खर्च कमी असतो.एक ते दीड तासात वाहन पूर्ण चार्ज करते.वाहन पूर्ण चार्ज होण्यासाठी 20 ते 30 युनिट्स वीज लागेल. त्याचा खर्च सुमारे 200 ते 400 रुपयांपर्यंत येऊ शकतो.दादरमध्ये इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्यासाठी प्रती युनिट 15 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे हे चार्जिंग स्टेशन आठवड्याचे सातही दिवस 24 तास नागरिकांच्या सुविधेसाठी कार्यरत असेल.( 24 hr open station)

चार्जिंग, ऑनलाइन आरक्षण, गाडी धुणे आणि पॉलिश, ड्रायव्हर्सना बसण्यासाठी जागा आणि उपाहारगृह या केंद्रात असणार आहे. अशाप्रकारे सर्व सुविधा देणारे हे मुंबईतील पहिले.इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्र आहे. या केंद्रात सर्व ब्रॅण्डची दुचाकी, तिचाकी आणि चारचाकी इलेक्ट्रिक वाहने चार्ज करता येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.वाहन चार्ज सुरू असताना प्रवाश्यासाठी येथील हॉलमध्ये आरामासाठी सोय केली आहे. तर उपाहारगृहात गरम पेय, हलका नाश्ता करता येईल, असेही पालिकेकडून सांगण्यात आले. ( Mumbai News: People get relief, vehicleclecharging station set up in Dadar)

इलेक्ट्रिक वाहनांची संख्या अधिक असलेल्या परिसरांमध्ये असे चार्जिंग स्टेशन सुरु करण्यासाठी अभ्यासपूर्ण सर्वेक्षण करुन सार्वजनिक वाहनतळांच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करावी, असे निर्देश उद्घाटनाच्या वेळी ठाकरे यांनी दिले.
;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments