बीएमसी

Mumbai news : प्रजा फाऊंडेशनचा अहवाल जाहीर, जाणून घ्या कोण आहेत, सर्वोत्कृष्ट नगरसेवक…

काँग्रेस पक्षाचे नगरसेवक व पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

Mumbai news : काँग्रेस पक्षाचे नगरसेवक व पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर एआयएमआयएम या पक्षाच्या वांद्रा – कुर्ला संकुल येथील नगरसेविका गुलनाज कुरेशी यांना शेवटचा क्रमांक मिळाला आहे. दरम्यान, प्रभादेवी येथून शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदाच निवडून आलेले समाधान सरवणकर यांनी दुसरा तर भाजपचे हरीश छेडा यांना तिसरा क्रमांक मिळाला आहे.Mumbai news: Praja Foundation report released, find out who are the best corporators …

पालिकेच्या विविध समित्या व प्रत्येक महिन्यात होणाऱ्या किमान चार महा सभेत 227 नगरसेवक हजेरी लावून आपल्या प्रभागातील समस्या मांडत असतात. 2017 – 2018 या पहिल्याच वर्षी 82.15 टक्के नगरसेवक सभांमध्ये हजर होते. परंतु, 2019 – 2020 मध्ये हे प्रमाण 73.70टक्क्यांवर आले आहे.

फेब्रुवारी 2021 मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे 227 वॉर्डांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नगरसेवकांच्या कामगिरीचे प्रगतिपुस्तक प्रजा या संस्थेने तयार केले आहे. यामध्ये 220 नगरसेवकांपैकी 198 नगरसेवकांना सी, डी, ई, एफ श्रेणी म्हणजेच 80 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. तर 80 ते 100 टक्के गुण मिळवणारे केवळ दोनच नगरसेवक आढळून आले आहेत.

महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रजा या बिगर शासकीय संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात केवळ दहा टक्केच नगरसेवक ए, बी, श्रेणी मिळवित अव्वल ठरले आहेत.तर 2017 ते 2021 या काळातील त्यांच्या कामगिरीसाठी 90 टक्के नगरसेवकांना 70 टक्क्यांहून कमी गुण मिळाले आहेत. या परीक्षेत काँग्रेस पक्ष बेस्ट ठरला असून विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे.

वर्षभराच्या कालावधीत 50 टक्के म्हणजे 115 नगरसेवकांनी 17 प्रश्न विविध समितीच्या बैठकीत उपस्थित केले. मात्र यापैकी 99 टक्के नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देण्यात आलेले नव्हते, असे या सर्वेक्षणात दिसून आले.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments