खूप काही

Mumbai News : श्रावणमास सुरू होताच भाजीपाल्याच्या किंमतीत झाली मोठी घट

भाजीपाला सहज विक्री होत असल्याने व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतमाल मागवला

Mumbai News : श्रावण महिन्याला सुरुवात झाली की ग्राहक मांसाहार बंद करुन शाकाराला पसंती देतात. त्यामुळे या काळात दरवर्षीच भाज्यांच्या मागणीत वाढ होताना दिसते.भाजीपाला सहज विक्री होत असल्याने व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतमाल मागवला. पण एपीएमसी मार्केटमध्ये माल जास्त झाल्यानं भाज्या पडून आहेत.(APMC Market)

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार एपीएमसी समितीमधील भाजीपाला मार्केटमध्ये 750 गाड्यांची आवक  झाली असून 3 लाख कोथिंबीर जुड्या बाजारात आलेल्या आहेत. परंतू नाशिक परिसरातून आलेल्याा(Nashik heavy rain)  कोथींबीरच्या जुड्या पावसामुळे भिजल्याने त्याची विक्री होऊ शकलेली नाही.त्यामुळे लाखो कोथींबीरच्या जुड्या बाजाराचा आवारात पडून असून सुकवण्यासाठी व्यापाऱ्यांनी ओपन शेडमध्ये पसरवून ठेवण्यात आल्या आहेत. कोथींबीर जुडी दर 5 रुपये असताना देखील ग्राहक खरेदी करत नसल्याने या जुड्या कचऱ्यात जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

बाजार दरात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने दहा रुपये किलो किमतीने अनेक भाज्या विकल्या जात आहेत. श्रावण महिन्यात उपवास असल्याने पालेभाज्यांना जास्त प्राधान्य दिले जाते. अशा काळात दहा रुपये दरापेक्षा कमी किंमतीत भाजीपाला मिळत असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. (Vegetable price down)

आज बाजारात भाज्यांची किंमत:  टोमॅटो 10 रुपये प्रति किलो, भेंडी 10 रुपये प्रति किलो ,कारले 10 रुपये प्रति किलो , मेथीची जुडी 20 रुपये कोथिंबीर 15 रुपये, आळूची पाने वीस रुपये, वांगी 20 रुपये किलो ,तर कोबी आणि फ्लॉवर 10 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.(tomato ,flower, lady finger,  potato)

शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसत आहे. श्रावण मासातील पहिल्याच आठवड्यात शेतकºयांना अपेक्षित भाव मिळू शकला नाही.( Farmers seem to have suffered huge losses.)

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments