आपलं शहर

Mumbai : बीफ खाण्यावरून संजय राऊतांनी भाजपला लगावला टोला

रेस्टॉरंटमध्ये घुसून तेथील किचनमध्ये गोमांस शोधमोहिमा राबवीत होती.

Mumbai :। भाजप आणि शिवसेने मधले वाद आता चांगलाच तापलेला दिसत आहे. रोज या दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहे. ‘बीफ’वरुन ‘मोदी सरकारच्या काळात जे झुंडबळी गेले, ते मानवतेस काळिमा फासणारे प्रकार होते.कोणाच्या घरात कोणत्या प्राण्याचे मांस शिजवले आहे, कोणत्या वाहनांतून गाय, बैल, म्हैस नेत आहेत यावर पाळत ठेवणारी पथके गेल्या निवडणूक काळात निर्माण केली गेली. ही पथके देशभरातील पंचतारांकित हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये घुसून तेथील किचनमध्ये गोमांस शोधमोहिमा राबवीत होती.­

मोदी सरकारने ( Modi Sarkar )@केंद्रात गोवंश हत्याबंदीचा कायदाच केल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले आहे. शेतकऱ्यांवरील भाकड गाई पोसण्याचे ओझे वाढले, पण गाय ही देवता नसून एक उपयुक्त पशू आहे या वीर सावरकरी भूमिकेचे समर्थन करणे हादेखील अपराधच ठरु लागला आहे. अर्थात दुसऱ्या मोदी पर्वात गोवंश हत्येचा विषय बासनात गुंडाळला गेला असून गोमातांचा दर्जा खाली गेला आहे. जागोजाग भाजपचे मंत्री व पुढारीच ‘बीफ’ खाण्याचे समर्थन करीत आहेत व सरकारमधील साध्वी, संत, महंत, मठाधीश गोमातांचे हंबरडे निमूटपणे ऐकत आहेत.

मेघालयचे भाजपचे मंत्री सनबोर शुलाई यांनी ‘ बीफ’ खाण्याचे समर्थन केलंय. पीबीफवरची बंदी उठली काय? सनबोर शुलाई यांच्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हा वगैरे दाखल करा, अशी मागणी आम्ही करणार नाही, पण ‘बीफ’ प्रकरणी ज्यांचे ‘झुंडबळी’ गेले, बीफ बाळगले म्हणून ज्यांना अपमानित ठरवून गुन्हे दाखल केले गेले, त्या सगळ्यांची माफी मागा! , अशी मागणी करत आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

संजय राऊतांनी  ( Sanjay raut)मेघालयाच्या भाजप नेत्यावर जोरदार टीका केली आहे. मेघालयात भारतीय जनता पक्षाचे मंत्री सनबोर शुलाई यांनी देशातील समस्त मांसाहारी मंडळींना एक दिव्य संदेश दिला आहे. मंत्रिमहोदय सांगतात, ‘लोकहो, चिकन, मटण, मासे कसले खाता? बीफ खा बीफ! गोमांस खा. त्यातच मजा आहे!’ गोमांस भक्षणाची ही अशी तरफदारी करणाऱ्या भाजप मंत्र्यांनी असे हिंदुत्वविरोधी वक्तव्य करूनही या महाशयांचा बालही बाका झाला नाही. भाजप हा एक हिंदुत्ववादी पक्ष आहे, पण त्यांचे हिंदुत्व राजकीय सोयीचे आहे काय, याचे आत्मपरीक्षण त्यांनीच करण्याची वेळ आली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments