Mumbai university : मुंबई विद्यापीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी, काय आहे सत्य..?
मुंबई विद्यापीठाला देखील ईमेलद्वारे बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. B.com निकाल लवकरात लवकर लावण्यात यावा, यासाठी धमकी आणि शिवीगाळ करण्यात आली आहे.

Mumbai university :परीक्षेच्या निकालाचं कामकाज सुरु असतानाच ही धमकी आली असून याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.निकाल लवकर लागले नाहीत तर विद्यापीठ उद्ध्वस्त करू अशी धमकी देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या ईमेल आयडीवरून मार्च २०२१ चे परीक्षेचे निकालाचे कामकाज सुरू असताना हे धमकीचे मेल आल्याचं सांगितलं जातं आहे.
अनेक दिवसांपासून बॉम्ब प्लांटिंगचे फेक कॉल येत आहेत. मुंबई विद्यापीठाला देखील ईमेलद्वारे बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. B.com निकाल लवकरात लवकर लावण्यात यावा, यासाठी धमकी आणि शिवीगाळ करण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठाला मेलवरून धमकी आणि शिवीगाळ करण्यात येत होती.10,11 आणि 12 तारखेला आले धमकीचे मेल आले आहेत. त्यापैकी 12 ऑगस्टच्या ईमेलमध्ये बीकॉमचे रिजल्ट्स लवकरात लवकर लावा असे, म्हणत मेलवर शिवीगाळ करत बॉम्बचे छायाचित्र पाठवण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे धमकीत ही आरोपींनी BSC, B.com, BA, यांचे 6 सेमिस्टरचे निकाल 6 च्या आत नाही लागले तर बाँम्बस्फोटाची चित्रे पाठवून विद्यापीठ उद्धवस्त करू अशी धमकी दिली होती. विद्यापीठातील डाँक्टर हे आलेले मेल तपासत असताना 9 जुलै व 10 जुलै रोजी दोन स्वतंत्र ईमेल आयडीहून ही धमकी आली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मुंबईत फेक कॉल आणि मेसेज करुन बॉम्ब स्फोट करुन उडवण्याच्या धमकी प्रकरणात वाढ झाली आहे. काही दिवसांपुर्वी मंत्रालयाच्या परिसरात बॉम्ब स्फोट घडवून आणणार असल्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी अज्ञातांना ताब्यात घेतलं होते. तसेच काही दिवसांपुर्वी अभिनेता अमिताभ बच्चनच्या बंगल्याजवळील परिसरात आणि ३ रेल्वे स्थानकांवर बॉम्ब स्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली होती.
हे ही वाचा :