Mumbai unlock : चौपाट्या, उद्याने, मॉल रात्री 10 पर्यंत सुरु, मात्र काय आहेत नियम, पाहा संपूर्ण माहिती
मुंबई महानगरपालिकेने नवीन नियमावली जाहीर केली आहे. यानुसार आता निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय

Mumbai unlock : मुंबई महानगरपालिकेने नवीन नियमावली जाहीर केली आहे. यानुसार आता निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेत मुंबईतील सर्व उद्याने, मैदाने, चौपाट्या सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी कोविड संबंधित सर्व नियमांचे अर्थात सोशल डिस्टन्सिंग, चेहऱ्यावर मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. या संदर्भात मुंबई महानगरपालिकेने एक पत्रकही काढलं आहे.
कोरोना रुग्णांची संख्या घटल्यामुळे मुंबईत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. कालपासून लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी लोकल प्रवासही सुरु झाला आहे. दुकानांच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत. मॉल सुरु झालेत. एकूणच परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मुंबई महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चौपाट्या, उद्यानं, मैदाने सकाळी 6 ते रात्री 10 वाजे पर्यंत खुले ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.आता पर्यंत समुद्र किनाऱ्यांवर जाण्यास पर्यटकांना बंदी होती तर उद्यानं, मैदाने दुपारच्या वेळी बंद ठेवण्यात येत होती. मात्र,आता सकाळपासून मोकळ्या जागा खुल्या राहाणार आहेत.
आपल्या पत्रकात मुंबई महानगरपालिकेने म्हटलं आहे की, कोविड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्यात अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेऊन कोविड प्रसाराला आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात निर्बंधांबाबत यापूर्वी वेळोवेळी पारित केलेले आदेश या आदेशाद्वारे रद्द करण्यात येत आहेत.
मुंबईत कोरोनाची स्थिती आता नियंत्रणात आली आहे. अर्थव्यवस्थेला उभारी देण्याच्या दृष्टीने महापालिका आणि राज्य सरकार महत्त्वाचे निर्णय घेत आहे. लोकल ट्रेन सुरु करण्याची आणि दुकानांच्या वेळा वाढवण्याची मागणी करण्यात येत होती. विरोधकांनी या दोन्ही मागण्या लावून धरल्या होत्या. अखेर सरकारने दोन्ही मागण्या मान्य केल्यात.
हे ही वाचा :