आपलं शहर

Mumbai update : कोट्यावधी चा निधी खर्च केला तरी, मुंबईतील रस्त्यावरील खड्डे कायम….

गेल्या महिन्यात वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस आणि त्यानंतर मुंबईत झालेली अतिवृष्टी यामुळे मुंबईतील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट

Mumbai update : गेल्या महिन्यात वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस आणि त्यानंतर मुंबईत झालेली अतिवृष्टी यामुळे मुंबईतील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली, असून रस्त्यांवर माेठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत कोटयवधी रुपयांचा खर्च केला आहे. मात्र दरवर्षी मुंबईत मुसळधार पावसानंतर रस्त्यांची चाळण होत आहे मग तो निधी गेला कुठे ?.यावर्षीचा पावसाळाही त्यास अपवाद नाही. 2020 मध्ये पावसाळ्यातील सुरुवातीच्या दोन महिन्यांत खड्ड्यांबाबत 315 तक्रारी आल्या होत्या.

रस्त्यातील खड्ड्यांच्या आतापर्यंत ४७१ तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत खड्ड्यांच्या तक्रारीत ४० टक्के वाढ दिसून आली आहे.यापैकी ३४३ खड्डे बुजवल्याचा दावा महापालिकेने केला आहे. यामध्ये पालिका व्यतिरिक्त अन्य प्राधिकरणांच्या अखत्यारीतील रस्त्यांचाही समावेश आहे. महापालिकेचे अ‍ॅप, सोशल मीडिया व ई मेलद्वारे खड्ड्यांबाबत नागरिक तक्रार करू शकतात.

मालाड, अंधेरी पश्चिम, कुर्ला, चेंबूर आणि भांडुप या विभागांतील खड्ड्यांच्या तक्रारी अधिक आहेत.आता पालिकेने खड्डे  बुजवले असले तरी गणेशोत्सव काळात आणखी खड्डे पडल्याच्या तक्रारी गणेशभक्तांकडून होत आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी खड्डे बुजवताना ते पुन्हा पडू नयेत याची काळजी घ्यावी अशी मागणी नागरिकांन कडून केली जात आहे.

मागिल वर्षी जून, जुलै महिन्यांत 315 खड्ड्यांच्या तक्रारी आल्या होत्या. तर या वर्षी याच कालावधीत त्याचं विभागस्तरावर 471 तक्रारी आल्या आहेत. मुंबईत 2055 किलोमीटर रस्त्याचे जाळे आहे. खड्डे बुजवण्यासाठी प्रत्येक विभागस्तरावर दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी मोठे खड्डे बुजवण्यासाठी दीड कोटी तर छोटे खड्डे बुजवण्यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नागरिकांकडून लवकरात लवकर खड्डे बुजविण्याची मागणी पालिकेला करण्यात आली आहे.

 

 

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments