खूप काही

Mumbai update : मुंबईची कोरोना संख्या घटली, मुंबईची कोरोना मुक्तीकडे वाटचाल

आजपर्यंत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण 7 लाख 11 हजार 920 रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत.

Mumbai update : महाराष्ट्रात सध्या कोरोनाचं संकट वाढल असल्याचं पाहायला मिळत आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनला असताना,मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी ही काही प्रमाणात दिलासादायक आहे.मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सध्या 04 हजार 887 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा दर हा 97 टक्क्यांवर असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होईल, असा विश्वास मुंबई महापालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह मुंबईतील रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत होती. पण मुंबईतील रुग्णसंख्या ही मागच्या काही दिवसात हळुहळु कमी झाली आहे. मुंबईची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत असल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 24 तासात एकूण 331 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आज एकुण 403 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आजची आकडेवारी ही काहीशी दिलासादायक असल्याचं पाहायला मिळत आहे.आजपर्यंत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण 7 लाख 11 हजार 920 रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments