आपलं शहर

Mumbai update : मुंबईतील मालमत्ता नोंदीत वाढ, गेल्या दहा वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत घरांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. शहरात जुलैमध्ये 10 वर्षांतील रेकॉर्डब्रेक 9037 युनिट्सची विक्री झाली.

Mumbai update :  देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत घरांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. शहरात जुलैमध्ये 10 वर्षांतील रेकॉर्डब्रेक 9037 युनिट्सची विक्री झाली. मुंबईत जून महिन्यात 7857 युनिट्सची मालमत्ता नोंदणी झाली होती. याचदरम्यान राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध हळूहळू शिथिल केले. त्याचा सकारात्मक परिणाम होत रिअल इस्टेट क्षेत्राला पुन्हा चालना मिळाली आहे. त्यामुळे पुढील महिनाभरात मालमत्ता नोंदणीचे प्रमाण 15 टक्क्यांनी वाढल्याचे जुलैच्या मालमत्ता नोंदणीच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

जुलै 2012 नंतर एका महिन्यात झालेली ही सर्वाधिक नोंदणी आहे. लसीकरणाला गती तसेच अर्थव्यवस्था सावरण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांमुळे रिअल इस्टेटला पुन्हा तेजी आल्याचे निरीक्षण जाणकारांनी नोंदवले आहे.जुलैमधील 53 टक्के मालमत्ता नोंदणी ही नवीन निवासी विक्रीतून झाली आहे. याआधी जूनमध्ये 42 टक्के, मेमध्ये 29 टक्के आणि एप्रिल महिन्यात 7 टक्के इतकी नवीन घरांच्या विक्रीची नोंदणी झाली होती.

मुद्रांक शुल्क सवलतीमुळे जुलैमध्ये मागील दशकातील विक्रमी मालमत्ता नोंदणी झाली आहे . सरकारने घर खरेदीदारांच्या मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याचा निर्णय पुन्हा लागू करावा . त्यामुळे नजीकच्या काळात घर विक्रीमध्ये आणखी वाढ होत जाईल , असे मत ‘ नरेडको महाराष्ट्र ‘ चे अध्यक्ष अशोक मोहनानी यांनी नोंदवले . क्रेडाई एमसीएचआयचे सचिव प्रीतम चिवुकुला यांनीही सरकारकडून मुद्रांक शुल्क माफीची अपेक्षा व्यक्त केली .

राज्य सरकारने अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी घेतलेले विविध निर्णय तसेच वेगाने राबवली जात असलेली लसीकरण मोहीम यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राने गती घेतली आहे. तसेच गृहकर्जांचे घटलेले व्याजदर, विकासकांनी दिलेली सूट तसेच फ्लेक्सी पेमेंट योजना आदी घटकांमुळेही घरांची मागणी वाढली आहे, अशी प्रतिक्रिया दि गार्डियन्स रिअल इस्टेट अॅडव्हायझरीचे कार्यकारी संचालक राम नाईक यांनी दिली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments