आपलं शहर

Mumbai update : मुंबईवर कोरोनानंतर, पावसाळ्यामुळे उद्भवणार्‍या नव्या रोगांचे सावट…

मुंबईत एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला असतानाच पावसाळ्यातील साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे.

Mumabi update : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना फेब्रुवारी 2021मध्ये पालिकेला या कोरोनाच्या पहिल्या लाटेवर नियंत्रण मिळविण्यात काहीसे यश आले होते. मात्र नंतर काही अतिउत्साही मंडळींच्या हलगर्जीपणामुळे व प्रशासकीय यंत्रणेच्या काहीशा ढिलाईपणामुळे कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारी 2021 च्या मध्याला मुंबईत धडकली व रुग्णसंख्येत चांगलीच वाढ झाली आहे. आता पुन्हा पालिकेने विविध उपाययोजना करून या दुसऱ्या लाटेवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविले आहे. त्यामुळेच पालिकेने कोविड निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला.

मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला व अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र दुसरीकडे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या लेप्टो, मलेरिया, स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, गॅस्ट्रो रुग्णांच्या संख्येत गेल्या एका महिन्यात दखल घेण्यासारखी वाढ झाली आहे. वरील आकडेवारीवरून ते निदर्शनास येत आहे. 2020  मध्ये 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीत मलेरियाचे  5006 रुग्ण आढळले आणि एका रुग्णाचा मृत्यू झाला होता.

तर लेप्टोचे 240 रुग्ण आढळले व त्यामुळे 8  रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर डेंग्यूचे 129  रुग्ण व 3 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे, गॅस्ट्रोचे 2549 रुग्ण आणि स्वाईन फ्ल्यूचे 44 रुग्ण आढळले होते. त्या तुलनेत 2019 मध्ये 1 जानेवारीपासून ते जुलैअखेरपर्यंत मलेरियाचे 557 रुग्ण आढळले. तर गॅस्ट्रोचे – 2319, लेप्टोचे 96 रुग्ण ( 1 मृत) , डेंग्यूचे 77, गॅस्ट्रोचे 1572 आणि स्वाईन फ्ल्यूचे 28 रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला असतानाच पावसाळ्यातील साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे.

जून 2021 मध्ये मलेरिया रुग्णांची संख्या 357 असताना जुलैमध्ये त्यात चांगलीच वाढ होऊन ही रुग्णसंख्या 557 वर गेली आहे. तर जूनमध्येच लेप्टो रुग्णांची संख्या 15 होती ती जुलैमध्ये 37 , डेंग्यू रुग्णसंख्या 12 वरून 28, गॅस्ट्रो रुग्णसंख्या 180 वरून 294 तर स्वाईन फ्ल्यू रुग्णांची संख्या 6 वरून 21 वर गेली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही काहीशी चिंतेची बाब आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments